Varas Nond: आता घरबसल्या अशा पद्धतीने करा वारसा ची नोंदणी…!

Varas Nond : आता नागरिकांना शेत जमिनीचा मालक मरण पावल्यास,त्याचे वारस जमीन मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये धावपळ करण्याची गरज नाही.कारण की,राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-हक्क प्रणाली द्वारे तुम्हाला आता तुमच्या घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून वारस नोंदणी करता येणार आहे .शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .Varas Nond

Varas Nond

तीन महिन्यात अर्ज करणे अनिवार्य

लक्षात असू द्या .नागरिकांना मालकाचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत मध्ये वारस नोंदीसाठी अर्ज करणे खूप आवश्यक आहे .या प्रक्रियेसाठी पूर्वी तलाठी कार्यालयामध्ये जावा लागत होतं एका कामासाठी किती हेलपाटे मारावे लागत होते .मात्र,आता शासनाने इ हक्क पोर्टलवरून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे त्यामुळे आता नागरिकांना ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे.Varas Nond

हे वाचा : शेत जमीन खरेदी करताना या गोष्टी तपासा अन्यथा होईल पश्चाताप.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ई-हक्क प्रणालीत उपलब्ध सेवा

ई- हक्क प्रणाली मध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे या प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना शेतकरी वारस नोंदणी, नाव दुरुस्ती, बोजा नोंद, करार अशा 7 ते 8 प्रकारच्या फेरफरांसाठी तुम्ही नोंदणी करू शकतात. या पोर्टलवर तुम्हाला अर्जाच्या स्थितीचा मागोवा देखील घेता येतो. तुम्ही केलेला अर्ज मंजूर झाल्यानंतर 17 व्या दिवशी हा अर्ज मंडल अधिकाऱ्याकडे पाठवला जातो आणि त्यानंतर 18 व्या दिवशी नोंद प्रक्रिया पूर्ण केली जाते.

अशी करा वारस नोंदणी ?

ई- हक्क प्रणाली द्वारे तुम्हाला वारस नोंदणी ऑनलाइन करता येणार आहे.

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या https://pdeigr.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • Proceed to login’ → ‘Create new user’ वर क्लिक करून नवीन यूझर खाते तयार करून घ्यावे लागेल .
  • त्या नंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल, पॅन, पिन कोड, जिल्हा, गाव, ई-मेल, पत्ता इ. माहिती भरून नोंदणी पूर्ण करून घ्या .

लॉग-इन करून अर्ज सुरू कसा करायचा?

  • यूझरनेम व पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
  • ‘7/12 Mutations’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
  • यूझर प्रकार Citizen/Bank निवडा व ‘Process’ वर क्लिक करा.
  • ‘वारस नोंद’ हा फेरफार पर्याय निवडा.

अर्ज भरण्याची प्रक्रिया:

  • अर्जदारा व्यक्तीची माहिती भरा.
  • अर्जदारा व्यक्तीची माहीत भरताना या मध्ये तुमहाल मृत व्यक्तीचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, मृत्यू दिनांक भरा आणि पुढे जा .
  • वारसांची नावे भरा’ या टॅबमध्ये प्रत्येक वारसाची माहिती भरून ‘सेव्ह’ करा.

आवश्यक कागदपत्रे आपलोड करा

ई- हक्क प्रणाली द्वारे तुम्हाला वारस नोंदणी ऑनलाइन करण्या साठी आवश्यक कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र, 8-अ उतारा, रेशनकार्ड अशा आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अपलोड करा.

अर्ज सबमिट करा

सर्व माहिती व्यवसतीत भरा आणि कागदपत्रे ऑपलोड करून अर्ज सबमिट करा. त्या अर्जावर प्रक्रिया सुरू होत आणि निश्चित कालावधीत नोंद केली जाते.Varas Nond

Leave a comment