या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 हजार रुपये लाभ. vayoshri yojana

vayoshri yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आणली. महत्व पूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राज्यातील 65 व 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत वितरित करते. या योजनेसाठी कोण पात्र आहे तसेच कोण अर्ज करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्ष व 65 वर्षावरील नागरिकांना 3000 हजार रुपये एक रकमी लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला. या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक लागणाऱ्या वस्तु वयोमानानुसार साधनांची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविणे हे आहे.

योजनेतून कोणत्या घटकासाठी अर्ज केला जाऊ शकतो

  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • होल्डिंग वाकर
  • कंबर बेल्ट
  • सर्वेकर कॉलर
  •  कमोड खुर्ची

vayoshri yojana अर्ज करण्यासाठी पात्रता.

  • अर्जदाराचे वय 65 व 65 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असावा.
  • पात्र लाभार्थ्यांना एक रकमी तीन हजार रुपये लाभ डीबीटी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे
  • अर्जदाराकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार आयकर भरणारा नसावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

अर्ज कोठे करावा

vayoshri yojana अर्ज करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी अर्ज व अर्जासोबत वर दिलेली कागदपत्रे सोबत सोडून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून आपल्या अर्जाची संपूर्ण तपासणी केली जाईल, व अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला पोहोच पावती दिली जाते.

3000 निधी कधी मिळणार

बऱ्याच नागरिकांच्या मनात याविषयी शंका निर्माण झालेली आहे की हा निधी प्रति महिना मिळणार का ? तर वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारे तीन हजार रुपये हे प्रति महिना नसून एक रकमी म्हणजे एकदाच मिळणार आहेत. अर्ज केल्यानंतर ही रक्कम एकदाच लाभार्थ्याच्या बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत जमा केली जाते.


लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर अर्जाची पूर्ण संबंधित विभागाकडून तपासणी केली जाते. समाज कल्याण विभागाकडून अर्ज तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती अपडेट केली जाते. त्यामध्ये आपला अर्ज मंजूर केला जातो किंवा काही त्रुटी असल्यास अर्ज परत त्रुटी भरून काढण्यासाठी पाठवला जातो. ज्यांचा अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना अर्ज मंजूर झाल्याच्या दिनांक पासून पुढील 30 दिवसाच्या आत लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत एक रकमी तीन हजार रुपये रक्कम जमा केली जाते.

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

वयोश्री योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

Leave a comment