VIDEO VIRAL देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन! पंतप्रधान नरेंद् मोदींनी केली घोषणा? काय आहे या मागचं सत्य, पहा…

VIDEO VIRAL सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात दावा केला जात आहे की, देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशात HMPV च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आपण आपण पाहत आहोत की, न्यूज द्वारे, सोशल मीडियावर, या आजाराविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहे. तसेच, HMPV रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन, हा दावा विशेषतः HMPV (Human Metapneumovirus) च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या चिंतेवर आधारित आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पण या व्हायरल पोस्टमागचं सत्य काय आहे? चला, ते जाणून घेऊ.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

व्हायरल पोस्टमध्ये काय दावा केला जात आहे?

व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, भारतात पुन्हा २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओचा संदर्भ दिला जात आहे, ज्यात लॉकडाऊनची घोषणा केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

VIDEO VIRAL लॉकडाऊन म्हणजे काय?

लॉकडाऊन हा एक आपत्कालीन उपाय आहे जो समुदायातील संपर्क मर्यादित करण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी लागू केला जातो. हा उपाय सामाजिक अंतर राखण्यासाठी आणि साथीच्या आजारांच्या प्रसारास थांबवण्यासाठी केला जातो. कोविड-१९ महामारीच्या काळात भारतात 25 मार्च 2020 पासून 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

VIDEO VIRAL

भारतात लॉकडाऊन कधी लागू झाला?

कोविड-19 महामारीच्या सुरुवातीला, 25 मार्च 2020 पासून भारतात संपूर्ण देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी हा लॉकडाऊन आवश्यक आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा असलेले देशही या विषाणूला थांबवू शकले नाहीत आणि तो कमी करण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव पर्याय आहे.

हे वाचा: नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय

सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन लागू होणार का?

सध्याच्या स्थितीत भारत सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार केलेला नाही. HMPV च्या रुग्णसंख्येतील वाढीमुळे सोशल मीडिया वर लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आले असले तरी, सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की भारत या समस्या सामोरे जाण्यासाठी तयार आहे आणि लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही. पूर्णत: स्वच्छता राखणे आणि मूलभूत खबरदारी घेणे या बाबी संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

VIDEO VIRAL व्हायरल व्हिडीओ आणि पोस्टची सत्यता

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये ज्यात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला असल्याचा दावा केला जात आहे, तो व्हिडीओ सध्याचा नाही तस 2020 सालचा आहे, जेव्हा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे हे पोस्ट पूर्णपणे खोटी माहिती पसरविणारी आहेत. या व्हिडिओवर कोणीही विश्वास ठेवू नये.

VIDEO VIRAL निष्कर्ष

भारत सरकारने लॉकडाऊन लागू करण्याच्या कोणत्याही अधिकृत घोषणेशी संबंधित कोणतेही विधान केलेले नाही. त्यामुळे, 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असा दावा खोटा आहे. HMPV च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आणि स्वच्छता राखणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत.

hmpv virus कोविड सारखा घातक नसून तो आधी पासूनच अस्तित्वात असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. या आजाराला लॉक डाउन लावण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देखील आरोग्य विभागाने दिली आहे. VIDEO VIRAL करण्यात आलेला व्हिडिओ खोटा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Leave a comment