पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या पात्रतेची अट : Vidyalaxmi Yojana

Vidyalaxmi Yojana : आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पैशाची चिंता करायची गरज पडणार नाही. कारण की, पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कर्ज दिले जाते. हे कर्ज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना हे कर्ज कोणत्याही बँकेकडून सहज घेऊ शकतील . या कर्जावर विद्यार्थ्यांना फक्त 3 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील 22 लाख गरीब कुटुंबातील विद्यार्थी दरवर्षी घेऊ शकतील.

Vidyalaxmi Yojana दरवर्षी 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ दरवर्षी 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले , केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान विद्यालक्षमी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात फक्त 3 टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिले जाईल. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे कर्ज देशातील सर्वोच्च 860 प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाईल, या योजनेतून दरवर्षी 22 लाख विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये कर्जमाफी. शेतकरी कर्ज माफी.

Vidyalaxmi Yojana कुठल्याही हमीशिवाय देण्यात येणार शैक्षणिक कर्ज

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज कोणत्याही हमी शिवाय दिले जाईल. केंद्र सरकार 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 75 टक्के क्रेडिट हमी देईल. जे बँकांना त्यांचे कव्हरेज आणि विद्यार्थ्यांना समर्थन वाढविण्यास मदत करेल. पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ हा अशा विद्यार्थ्यांना दिला जाईल ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. हे 4.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध असल्याचे संपूर्ण व्याज अनुदानाव्यतिरिक्त आहे. विद्यार्थ्यांना या कर्जासाठी पीएम विद्या लक्ष्मी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.

या योजनेचा लाभ हा देशातील उच्च दर्जाच्या उच्च शैक्षणिक संस्थांना लागू आहे. त्या संस्थांसाठी लागू असेल च्या एनआयआरएफ रेकॉर्डिंग द्वारे आधारित केले आहे. यामध्ये सर्व खाजगी आणि सरकारी उच्च शिक्षण संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार, NIRF मध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळालेल्या संस्था किंवा राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संस्था एनआयआरएफमध्ये 101-200 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज पात्रता आणि निकष

विद्या लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील दिलेले पात्रता आणि निकष पूर्तता करणे आवश्यक आहे .

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे 10+2 पूर्ण तत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याला अंडर ग्रेजुएट (UG), पोस्टर – ग्रॅज्युएशन (PG) किंवा कुठलेही एकात्मिक अभ्यासक्रमासाठी फक्त एकदाच या कर्जाचा लाभ घेऊ शकतात.

Leave a comment