Vihir Anudan उन्हाळा आलाय.. जुन्या व नव्या विहिरीचे काम सुरू करायचे असेल तर जाणून घ्या किती मिळते अनुदान!

Vihir Anudan : सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे . या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनानवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते . या योजनेतून प्रत्येक वर्षी विहिरी (Vihir Anudan) खोदल्या जात आहेत .शासनाने अनुसूचित जाती,नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली आहे .या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते

प्रत्यक्षात ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे आणि लाभार्थ्यांसाठी अनुदान हे समाज कल्याण विभागातर्फे दिले जात आहे .या योजनेअंतर्गत लाभ घेऊन बऱ्याच विहिरी खोदल्या जात आहे असे विभागाच्या वतीने वतीने सांगण्यात आले .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vihir Anudan

विहीर खोदण्याचे काम उन्हाळ्यातच का केले जाते?

कारण की पावसाळ्यामध्ये चिखल असतो व पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही.त्यामुळे वीर खोदण्याचे काम उन्हाळ्यातच केले जाते.तसेच शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये शेतीतले इतर कामही नसतात,अन्य कामाच्या व्यापातून वेळ मिळतो या कारणामुळे पण अनेक शेतकरी उन्हाळ्यातच विहीर (Vihir Anudan) खोदण्याचे काम करत असतात.

हे वाचा : कृषी विस्तार अधिकारी,पंचायत समिती,कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद

निवड समितीत कोण?

लाभार्थी निवडीसाठीची समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यालय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असते .यामध्ये सहा सदस्य कार्य करत असतात .

या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला किती अनुदान दिले जाते?

  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी (Vihir Anudan) अडीच लाख रुपये दिले जातात .
  • तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये दिले जातात
  • आणि इनवेल बोरिंगसाठी 20 हजार रुपये दिले जाते
  • कृषी पंपासाठी 20 हजार रुपये विज जोडणी साठी 10 हजार रुपये
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये
  • ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपये
  • तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये अनुदान दिले जाते .

पात्रता आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा नवबौद्ध अनुसूचित जातीमधील असावा, त्या शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा .नवीन विहीर (Vihir Anudan) खोदण्यासाठी कमीत कमी एक एकर जमीन त्या शेतकऱ्यांकडे असावी .शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा , आठ अ असावा.विहीर सोडता इतर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी .लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्ड त्यांचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आत मध्येच असले पाहिजे .

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा : कृषी विस्तार अधिकारी,पंचायत समिती,कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद

Leave a comment