Vihir Satbara Nond : अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या झाडांची, बोरवेलची आणि विहिरीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर करत नाहीत. पण आता ही नोंद करणे खूप आवश्यक झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची, बोअरवेलची आणि झाडांची नोंद केलेली नसेल तर त्यांना आता स्मार्टफोन किंवा संगणकच्या माध्यमातून ही नोंद घरबसल्या करता येणार आहे.
या अगोदर शेतकऱ्यांना जमिनीवरील विहीर आणि बोअरवेलची नोंद करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये जावे लागत होते. तसेच एकदा जाऊन काय ही नोंद होत नव्हती अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या. यासाठी वेगवेगळे कागदपत्रे, वेळ आणि पैसे खर्च करावे लागत होते. त्यामुळे ही प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी ई-पीक पाहणी DCS 2.0 या प्रणालीची अमलबजावणी केली आहे.Vihir Satbara Nond

ई- पीक पाहणी DCS 2.0 हे ॲप कशी मदत करते?
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनवरून घरी बसल्या विहीर, बोअरवेल आणि शेतातील झाडाची करता येणार आहे. ही प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन आहे यासाठी शेतकऱ्यांना कोणताही लेखी अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तसेच शेतकऱ्यांना शुल्क किंवा इतर कोणाचे गरज पडणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया खूप सोपी आणि जलद व बिना खर्चाची आहे.
हे वाचा : मोफत करा वारसाची सातबारेवर नोंद…
सातबारावर अशी करा विहीर, बोरवेल आणि झाडांची नोंदणी
सातबारावर विहीर (Vihir Satbara Nond) बोअरवेल किंवा झाडाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ई-पीक पाहणी DCS 2.0 ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे नाव आणि बँक खाते क्रमांक निवडून घ्यावे लागेल. त्यानंतर कायम पड किंवा चालू पड गट निवडून , कूपनलिका पड ( विहिर ) बोअरवेल हा पर्याय निवडा .त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील बोअरवेल किंवा विहीर याचा एक फोटो काढून अपलोड करा .त्यानंतर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून .त्या माहितीची पडताळणी करून स्वयंघोषणापत्र सबमिट करा .अशा पद्धतीने तुम्ही सातबारावर बोअरवेल किंवा वीहीर नोंदणी करू शकतात .Vihir Satbara Nond
या ॲपच्या सुविधेचे महत्त्वाचे फायदे
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बोअरवेल आणि विहीर नोंदणी करणे ही सेवा 100% मोफत आहे यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च नाही. शेतकऱ्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये या कामासाठी चक्रा मारण्याचे गरज नाही .सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारावर विहीर आणि बोरवेल नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. विशेषता :पाणीपुरवठा आणि सिंचन योजनेसाठी ही नोंदणी असणे खूप महत्त्वाचे आहे कारण की सातबारा वर विहीर आणि बोअरवेल ची नोंदणी दिसल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळवणे सुलभ होते .यामुळे कोणतेही अडथळे निर्माण होत नाही .
सरकारचे डिजिटल शेतीकडे एक मोठे पाऊल
राज्य सरकारच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या व्यवहारात डिजिटल सोयीचा समावेश होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारी ही प्रणाली शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे . Vihir Satbara Nond