voter list : जून 2024 मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. देशातील लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची संख्या आणि आता राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानची मतदार संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नोंदी/नवीन नावे जोडण्यात आली आहे.
लोकसभा 2024 निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 एवढे होते. त्यानंतर आता 20 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार झाले आहेत. अवघ्या 4 ते 5 महिन्यातच राज्यामध्ये 36 लाख 31 हजार 279 मतदारांची नवीन भर पडली आहे. या नुसार प्रत्येक मतदार संघात सरासरी 10000 मतदार यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
हे वाचा: मतदान नाव नोंदणी प्रक्रिया
voter list. मतदार संख्या वाढीची कारणे.
वाढती लोकसंख्या हे तर मुख्य कारण मतदान यादीत नोंदणी वाढण्याचे आहेच. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडून वारंवार प्रचार व प्रसिद्धी करून नवीन नावे नोंदणीसाठी उपक्रम राबवले जातात. आणि आता मतदाराला सहज आणि सोप्या पद्धतीने स्वतः देखील मतदान यादीत नाव जोडण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्ती जो मतदान यादीमध्ये नाव जोडण्यास पात्र आहे. प्रत्येक व्यक्ती आपली स्वतः आपल्या मोबाईलवरून देखील आपले नाव आपल्या मतदान यादीत जोडू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची वाढ पहायला मिळत आहे.
तंत्रज्ञाचा वापर करून जागृती करणे.
केंद्रीय निवडणूक आयोग नेहमी मतदान नाव नोंदणी साठी आवाहन करत असते. त्या सोबतच सर्व माध्यमांचा वापर करून देखील नाव नोंदणी करण्यासाठी आवाहन केले जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरात करून नवीन नाव नोंदणी साठी जागृती केली जाते. सोशल मीडिया च्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी करण्याची जन जागृती करण्यात येते. याचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांनी आपली नोंदणी करण्याची प्रक्रिया राबवून नवीन नाव नोंदणीची संख्या वाढवली आहे.