Voter list add name प्रत्येक नागरिकांना वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा हक्क आहे. पण त्यासाठी सर्व नागरिकांना आपले नाव मतदान यादी मध्ये देणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे, आणि त्या ओळखपत्रासाठी यादीमध्ये नाव नोंदणी खूप गरजेचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान यादी मध्ये नाव नोंदवू शकतात . कारण की देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे. जर तुम्हाला तुमचे नाव मतदार यादी मध्ये ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या नोंदवायची असेल किंवा या अगोदर ज्या व्यक्तीने आपले नाव नोंदवले होते पण यादीत नाव आहे की नाही हे तपासायचे असेल तर अशा व्यक्तींसाठी ही न्यूज खूप महत्त्वाची आहे.
Voter list add name मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे ते पहा
Voter list add name ज्या व्यक्तीला आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवायचे असेल त्या व्यक्तीने यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म 6 भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक तपशील जसे की, व्यक्तीचे नाव, पिन कोड, पत्ता, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक भरावा लागेल तसेच तुमचा रंगीत फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा सादर करावा लागेल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदार यादी मध्ये नोंदवू शकतात.
मतदार यादीत आधीच नाव असेल तर ते कसे तपासावे?
जर तुम्ही आधीच नोंदणीकृत मतदार असाल, तर
https //electoralsearch.in/ या वेबसाईटवर जाऊन तुमच्या EPIC क्रमांकाने किंवा वैयक्तिक माहिती भरून मतदार यादीत नाव तुमचे आहे का हे तपासून शकाल.
अशा पद्धतीने मतदार यादीत अगोदरच नाव असेल तर ते तपासून शकाल.
वरील दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तींना आपले मतदार यादी मध्ये नाव द्यायचे आहे किंवा ज्यांचे नाव मतदार यादीतआहे की नाही हे तपासायचे आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा आहे, आणि ती अतिशय सोपी पण आहे. तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत नोंदवू शकतात .
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.