Weather Update : सध्या उन्हाचे वातावरण सुरू असतानाच मार्च महिन्यापासून राज्यात कडक ऊन पडायला सुरुवात आहे तर कुठे ,पाऊस, वारे, गारपीट होत आहे .
आज 25 मार्च रोजी सायंकाळी राज्यात पावसाची शक्यता आहे . आपण 24 मार्च रोजी आठ वाजल्यापासून ते 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस झाला हे पाहूया .चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, आणि बेळगाव मध्ये पाऊस (Weather Update) झालेला पाहायला मिळाला आहे. तसेच, धाराशिव आणि सांगलीच्या काही भागांमध्ये पण काही पावसाची शक्यता आहे. Weather Update

राज्यातील काही जिल्ह्यात तापमान वाढले
राज्यात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणांचे काल नोंदवले गेलेले तापमान पुढीलप्रमाणे होते:
- अकोला – ४०.२°C
- नंदुरबार – ४०.५°C
- बीड – ३९.४°C
- जळगाव – ३९.३°C
- अमरावती – ३९.४°C
- मुंबई (सांताक्रूझ) – ३३°C
- मुंबई (कोलाबा) – ३२°C
सध्या दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने वाऱ्यांचा वेग वाढला आहे आणि हवामानात अचानक बदल होत आहेत. Weather Update
हे वाचा : एप्रिल पासून बँकेच्या नियमांत होणार मोठे बदल. खात्यावर ठेवावी लागणार जास्तीची रक्कम.
ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता
सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा या भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सांगली आणि बेळगाव शहरांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कराड आणि शेडगेवाडी परिसरात हलकी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
तालुका-निहाय पावसाची शक्यता
सातारा, जावळी ,पाटण, कराड, शिराळा आणि वाळवा या तालुक्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच चंदगड, आजरा, मिरज आणि सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातही पवसच आंदच वर्तवला जात आहे . Weather Update
26 मार्च रोजीचा हवामान अंदाज
पुढील २४ तासांत (Weather Update) काही भागांत पावसाची तीव्रता कमी होईल, मात्र कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्याच्या काही भागांमध्ये वळवाच्या सरी येण्याची शक्यता कायम आहे. साताऱ्यातही स्थानिक पातळीवर ढग दाटून येण्याची शक्यता आहे .
येत्या 4 ते 5 दिवसा पाऊसचा अंदाज
मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीस राज्यात पुन्हा एकदा गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे. पुढील काही दिवसांत हवामान खात्याकडून अधिक अचूक अंदाज येत्या काही दिवसात देण्यात येईल. Weather Update
1 thought on “Weather Update राज्यात पावसाची शक्यता ; हवामान अंदाज आणि तापमान बदल ,पहा सविस्तर…”