Weather Update राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका, येत्या दोन ते तीन दिवसात कसा राहणार हवामान? पहा सविस्तर

Weather Update : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागांत अवकाळी पाऊस ,वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.Weather Update

Weather Update

पुढील काही दिवस हवामान कसे राहणार?

IMD च्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत देशासह राज्यातही तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कालावधी वाढू शकतो. महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य भागात आवकळी पावसाची शक्यता असून त्यामुळे आंबा पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.Weather Update

हे वाचा : रोजगार हमीच्या मजुरीत वाढ! किती मिळेल रोजगार?…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोल्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांत काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात मुर्तीजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातिल काही भागात पाऊस पडला आहे .काल 31 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला (Weather Update) सुरुवात झाली जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता बसला आहे. विशेषतः कांद्याच्या उत्पादनावर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ज्वारीसह इतर पिकांवर परिणाम

जळगाव जिल्ह्यात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. काल (31 मार्च) संध्याकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि हवामान तज्ज्ञांनीही पावसाचा अंदाज वर्तवला होता. होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 31 मार्च पासूनच ढगाळ वातावरण होते.आणि हवामान तज्ञांनी पण पावसाची शक्यता सांगितली होती. त्यानुसार सायंकाळी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस पोहोचले होते. आता मात्र, अवकाळी पावसाने वातावरणामध्ये थोडीशी थंडी निर्माण झाली आहे. Weather Update

शेतकऱ्यांनी घ्यायची खबरदारी

अवकाळी पावसामुळे (Weather Update) होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे:

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today
  1. काढणीला आलेली पिके त्वरित गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवावीत.
  2. साठवलेल्या धान्यास आर्द्रतेपासून संरक्षण मिळेल याची काळजी घ्यावी.
  3. हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून शेतीविषयक निर्णय घ्यावेत.
  4. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाच्या मदत योजनेसाठी त्वरित अर्ज करावा.

निष्कर्ष

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान अनिश्चित राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. शासनाने देखील मदत उपाययोजना जलदगतीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.Weather Update

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

Leave a comment