ई-पीक पाहणी महत्व न केल्यास मदतीपासून राहाल वंचित होणार मोठे नुकसान


ई-पीक पाहणी महत्व न केल्यास या मदतीपासून राहाल वंचित होणार मोठे नुकसान

ई-पीक पाहणी महत्व: शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंद न केल्यास शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, पिक विमा तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती संबंधी मिळणाऱ्या शासकीय अर्थसहाय्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे, ही सध्याची निर्माण झालेली परिस्थिती आहे.

ई-पीक पाहणी महत्व

ई-पीक पाहणी महत्व न केल्यास होऊ शकते हे नुकसान

ई- पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही शासकीय बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ॲपद्वारे त्यामध्ये पीक पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. अॅपमध्ये नोंदविलेला पीक पेरा थेट सातबारावर येणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ मिळण्यासाठी याची मदत होणार आहे. या ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्यास शेतात जाऊन करावयाची आहे. तसे न केल्यास आपला सातबारा कोरा राहू शकतो व आपण आपल्या शेतात पिक पेरणी केली नाही त्या मुळे आपली जमीन पडीक म्हणून घोषित होते. व शासनाच्या मिळणाऱ्या कोणतेही आर्थिक लाभ किंवा योजना आपल्याला मिळत नाहीत.

ई पिक पाहणी महत्व परिणामी, सरकारकडून मिळणारी मदत असेल , पीक विमा असेल , पीक कर्ज असेल हे सर्व लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पीक पाहणी संबंधी ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या संकल्पने नुसार ई- पीक पाहणी ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपद्वारे एका अॅण्ड्रॉइड मोबाइलवर २० खातेदारांची पीक पाहणी भरता येऊ शकते.

अशी करा आपली ई पिक पाहणी

ई-पीक पाहणी महत्व आपण पहिले आहे परंतु ही ई पिक पाहणी कशी करावी या बद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. ई पिक पाहणी करण्यासाठी आपल्या मोबाइल मध्ये आपल्याला ई पिक पाहणी हे अॅप प्ले स्टोर वरुण डाउनलोड करावे लागेल त्या नंतर त्या अॅप मध्ये शेतकरी नोंदणी या पर्यायचा वापर करून आपला विभाग जिल्हा तालुका व गाव निवडून घ्यावे लागेल. त्या नंतर आपला गट नंबर भरून आपली माहीती व क्षेत्र दिसेल त्या मध्ये आपन घेतलेले पिक व पिकाचे क्षेत्र भरून आपल्या पिकाचे फोटो घेऊन माहिती सबमीट करून घ्या. ई पिक पाहणी कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Close Visit Batmya360