कापूस आणि सोयाबीन अनुदान साठी नवीन तारीख : का होतोय विलंब ?

कापूस आणि सोयाबीन अनुदान तारीख : उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा कायम. वारंवार सरकार कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणामध्ये बदल करत आहे. 21 ऑगस्ट पासून या अनुदानाचे वितरण होणार असल्याचे सांगत होते परंतु सप्टेंबर महिना संपूर्ण संपत आला तरी पण अजून सोयाबीन आणि कापूस अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले नाही . आणि सोयाबीन आणि कापूस अनुदानामध्ये वारंवार सरकार बदल करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे. 21 ऑगस्ट पासून सोयाबीन आणि कापूस अनुदाना वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु आज पर्यंत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरित करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानची वाट पाहावी लागत आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

26 सप्टेंबर चा कार्यक्रम रद्द

कापूस आणि सोयाबीन अनुदान या अगोदर शासनाने 26 सप्टेंबर या रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. आणि आता सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाचा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेला आहे. 29 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. कृषी मंत्री महोदयांनी या अगोदर 5 ऑक्टोबर ची तारीख दिलेली होती परंतु आता 29 सप्टेंबर रोजी कापूस सोयाबीन अनुदान वितरण होणार आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदान

कापूस सोयाबीन अनुदान,दुसरी यादी अपडेट.

राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांना 29 सप्टेंबरला 1690 कोटीचे अनुदान वितरित होणार

29 सप्टेंबर 2024 रोजी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत 2516 कोटी रुपयांचे अनुदान योजनेतून वितरित केले जाणार आहे.आणि यातील सरासरी 1690 कोटी रुपयांची रक्कम राज्यातील पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे.

राज्यातील शेतकरी अनुदानासाठी पात्र

पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जवळपास 41,99,614 शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत. या अनुदानासाठी पात्रता पीएम सन्मान निधीच्या पोर्टलवर केवायसी केलेले शेतकरी किंवा कृषी विभागाकडे केवायसी पूर्ण केलेली शेतकरी यामध्ये सहभागी आहेत.

लाभ मिळणारे जिल्हानिहाय शेतकरी

कापूस आणि सोयाबीन अनुदान अमरावती जिल्ह्यातील 1,43,097 शेतकरी, अकोला जिल्ह्यातील 1,36,707 शेतकरी, कोल्हापूर मधील 30,128 शेतकरी, अहमदनगर मधील 2,58,102 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 47,637 शेतकरी, आणि संभाजीनगर मधील 2,11,216 शेतकरी या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.

  • धाराशिव 2,00,109 शेतकरी
  • जालना 3,20,066 शेतकरी
  • धुळे 41,725 शेतकरी
  • नागपूर 52,725 शेतकरी
  • नंदुरबार 41,154 शेतकरी
  • नांदेड 3,52,993 शेतकरी
  • नाशिक 95,706 शेतकरी
  • परभणी 2,09,634 शेतकरी
  • पुणे 18,511
  • बुलढाणा 2,96,853 शेतकरी
  • बीड 3,66,059 शेतकरी
  • यवतमाळ 2,00,962 शेतकरी
  • लातूर 2,44,712 शेतकरी
  • वर्धा 80,491 शेतकरी
  • वाशिम 1,62,670 शेतकरी
  • सोलापूर 49,419 शेतकरी
  • सांगली 23,762 शेतकरी
  • सातारा 89,109 शेतकरी
  • हिंगोली 2,11,830 शेतकरी
  • गोंदिया 2 शेतकरी
  • गडचिरोली 1,193 शेतकरी
  • भंडारा 454 शेतकरी

एकूण सर्व 41,99,614 शेतकरी

सर्वात कमी लाभ मिळणारे जिल्हे

  • गडचिरोली 1,193 शेतकर
  • गोंदिया 2 शेतकरी
  • भंडारा 454 शेतकरी
    या राज्यातील पहिल्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना, 29 सप्टेंबरला दिला जाणार लाभ

29 सप्टेंबर रोजी 4192 कोटीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्यांचा डाटा शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे 29 सप्टेंबर रोजी पैसे खात्यात जमा करण्यात येणार आहेत.41,99,614 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

4192 कोटी रुपये अनुदान SBI च्या बँक खात्यात

कापूस आणि सोयाबीन अनुदान पहिल्या टप्प्यातील 4192 कोटी रुपयांची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया कडे जमा करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि माहिती शासनाच्या पोर्टलवर अपडेट होईल तसे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.

Leave a comment

Close Visit Batmya360