कुसुम सोलार पंप देशातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आपल्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून, तसेच केंद्र शासनाचे कुसुम सोलार पंप योजना ही महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास सिंचनाची सुविधा दिली जाणार आहे त्यासाठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. कारण की केंद्र शासन 30 % अनुदानावर राबवण्यात येत होती. परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना 90 ते 95 % अनुदानावर राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 8 लाखांहून जास्तीत जास्त सोलार पंप योजनेचा लाभ दिला जाणार असून ही योजना 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करावी. जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असे या योजनेमागचा उद्देश आहे.
505,000 सोलर पंपाचा महाराष्ट्राला वाढीव कोटा
2024 मध्ये केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत महाराष्ट्राला 505,000 सोलर पंपाचा कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत या अगोदर महाराष्ट्राला405,000 पंपाचा कोटा होता. या योजनेअंतर्गत राज्यातील आतापर्यंत 13,865 यशस्वी इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे तसेच, या योजनेअंतर्गत उर्वरित शेतकऱ्यांना 60,000 पेक्षा जास्त प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप दिले जाणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
सोलर पंप योजनेतील कंपोनंट सी अंतर्गत फिडर सोलरायझेशन
कुसुम सोलार पंप योजनेच्या कंपोनंट सी अंतर्गत आयपीएस साठी राज्याला कोटा देण्यात आलेला नव्हता. परंतु प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेतील महाराष्ट्र राज्याला सोलार पंपाचा वाढीव कोटा मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये 7,75,000 कुसुम सोलार पंपाचा समावेश आहे. तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कृषी फिडरचे सोलरायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 3,600 पंपांचे वितरण
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत 3,600 पंपांचे अर्ज करण्यात आले असून, राज्यातील उर्वरित पंपांची वितरण लवकरात लवकर करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 2024 25 साठी वाढीव कोटा 8 लाख शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की, प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत 2024-25 साठी राज्य शासनाला तीन लाख सोलार पंप देण्यात येणार आहे.8 लाख शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ 2026 पर्यंत दिला जाणार आहे, यामध्ये दरवर्षी दीड लाख कुसुम सोनार पंपांचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेतील लाभ
प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेत केंद्रशासनाअंतर्गत 30 % लाभ दिला जातो, तर उर्वरित 60% राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतः 10% रक्कम भरावी लागते. यामुळे या योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात त्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये कुसुम सोलर पंप उपलब्ध होतात. जास्तीत जास्त फायदा होतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सूचना
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना खूप कमी खर्चामध्ये कुसुम सोलर पंप उपलब्ध होणार आहे, तसेच स्वच्छ ऊर्जाचा लाभ मिळणार आहे. तुझ्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
1 thought on “महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजनेतून अतिरिक्त कोटा मंजूर; 8 लाख शेतकऱ्यांना दिले जाणार सोलार पंप”