लाडकी बहीण योजना २१०० रुपये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना २१०० : निवडणुकीतील महत्त्वाचा निर्णय
२०२४ च्या जुलै महिन्यात अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. योजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली आणि निवडणुकीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले.
लाडकी बहीण योजना २१०० महायुतीच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, महिलांना निवडणुकीनंतर २,१०० रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. आता महायुतीला विधानसभा निवडणुकीत २३५ जागांवर विजय मिळाल्याने या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे. तसेच, आगामी हप्त्याद्वारे १५०० रुपये दिले जाणार की २१०० रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.महिलांच्या अपेक्षांनुसार अधिक रक्कमेसह दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा लाडकी बहीण योजना’ २१०० रुपये
महिलांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे स्पष्ट केले. शिंदे यांनी यावेळी म्हटले,
“महिला ही आपली लाडकी बहीण आहे, म्हणूनच या योजनेला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ठरल्याप्रमाणे आता योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम २,१०० रुपये असेल.”
त्यांनी विरोधकांवर टीकाही केली आणि म्हटले की, महिलांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे विरोधकांचे गणित बिघडले आहे.
महायुतीचा विजय: महिलांचा विश्वासमहत्वाचा
लाडकी बहीण योजना २१०० महायुतीने निवडणुकीत महिलांच्या भावनांचा आदर राखत त्यांना आधार देण्याचे वचन पूर्ण केले आहे. महिलांनी महायुतीवर दाखवलेला विश्वास निवडणुकीत निर्णायक ठरला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या मते, महिलांनी घेतलेला योग्य निर्णय महायुतीला भक्कम विजय मिळवून देणारा ठरला आहे.
हे वाचा:उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कापूस सोयाबीन अनुदान मिळणार
महिलांसाठी लाडकी बहीण योजना का महत्त्वाची?
१. आर्थिक आधार: या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला आर्थिक पाठबळ मिळते.
२. सामाजिक सक्षमीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनाचा मोठा फायदा होतो.
पुढील हप्ता कधी मिळणार?
महिला उत्सुकतेने पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा सहावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल. यासोबतच वाढीव रक्कमेसह नवीन दराने रक्कम दिली जाणार असल्याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
योजना महिलांच्या जीवनात कसा बदल घडवणार?
या योजनेतून महिलांना मिळणारी आर्थिक मदत केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठीही उपयोगी ठरणार आहे. वाढीव रक्कमेमुळे महिलांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी होण्यास मदत होईल.
महायुतीच्या विजयाची परिणामकारकता
लाडकी बहीण योजना २१०० महायुतीच्या विजयाने राज्यातील महिलांना नवी आशा दिली आहे. सरकारने महिलांसाठी राबवलेल्या या महत्त्वाच्या योजनेने निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महिलांनी महायुतीवर दाखवलेला विश्वास या विजयाचा खरा आधार ठरला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल राज्यातील महिलांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण करणारे ठरेल, आहे .