जीवघेणा विषारी लसून भारतामध्ये चीनच्या लसूण ला बंदी घातलेली असतानाही भारतामध्ये चिनी लसूण तस्करीच्या माध्यमातून बाजारात दाखल झाला आहे. चिनी लसूण हा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जीवघेणा विषारी लसून आरोग्याला हानिकारक असल्यामुळे सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे . हा लसूण आरोग्यासाठी खूप घातक असल्यामुळे सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे कारण यात हानिकारक जीवघेण्या विषारी कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असते. यामुळे सरकारने चीन मधून आलेल्या लसणावर बंदी घातलेली होती बंदी घातलेली असूनही भारतात हा चीनचा लसूण तस्करीच्या माध्यमातून बाजारात दाखल झाला आहे. कारण भारतात उत्पादन होणाऱ्या लसणाच्या तुलनेत चिनी लसूण खूप स्वस्त असल्याने तो बेकायदेशीरपणे तस्करी करून बाजारात आणला जात आहे. आणि त्याची विक्री बिनधास्तपणे सुरू आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया
जीवघेणा विषारी लसून भारतात चिनी लसणाचा खुलासा
या लसणाला बंदी असताना पण गुजरात मधील राजकोट मध्ये 30 पोते चायनीज लसूण आढळून आले, आढळून आल्यामुळे उघड झाले की चिनी लसूण भारतामध्ये विक्री होत आहे. तसेच हाल लसुन गोंदलच्या कृषी बाजार समितीत हा लसूण सापडला, त्यानंतर तिथे मोठा गदरोळ झाला .
बाजारामध्ये आलेल्या बेकायदेशीर चायनीज लसणाच्या पुरवाठ्या विरोधात 1 दिवसीय आंदोलन पण आयोजित केले.
हा लसूण स्थानिक लसणापेक्षा जास्त स्वस्त असल्यामुळे त्याची तस्करी केली जाते आणि भारता मधल्या लसणाच्या किमती बरोबर त्या चिनी लसणाचे विक्री केली जाते आणि चांगला नफा पण मिळतो. पण मात्र हा लोकांच्या आरोग्याशी खेळलेला जीवघेणा खेळ आहे. पण आता गुजरात सरकारने राज्यभरातील बाजारपेठ्यांमध्ये चायनीज लसुन बेकायदेशीरपणे पुरवठा केला आहे का हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेपाळ मार्गे चायनीज लसूण भारतात दाखल
चायनीज लसणाची एन्ट्री नेपाळ सीमेवरून होत आहे. तसेच चिनी हा जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, जेव्हापासून स्थानिक लसूण महाग झाला आहे, तेव्हापासून चायनीज लसणाचा व्यवसाय वाढला आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, घाऊक बाजारात चायनीज लसूण येण्याऐवजी तो छोट्या बाजारपेठेत आणि तिथून लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.