PM KISAN पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जाते . या योजनेची सुरुवात 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आपण या लेखामध्ये या योजनेची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे अंमलबजावणी 1 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आलेली होती आणि 24 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना राबवण्यात ही योजना केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे . या योजनेचे मुख्य उद्देश आहे ते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
PM KISAN योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
- पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रुपये दिले जाते. ही रक्कम पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2,000 रुपये , जमा केली जातात.
- पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी 2 हेक्टर पर्यंत (लगभग 5 एकर) शेतजमीन सर्व लहान मोठे आणि सीमांत शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
- पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभाची रक्कम DBT अंतर्गत हस्तांतरित केली जाते.
- या योजनेचा अर्ज शेतकऱ्यांना स्वतः किंवा आपले सेवा केंद्र (CSC) येथे जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
PM KISAN आता पर्यंत योजनेची प्रगती
पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत मागील चार वर्षांमध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहेत, तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. आतापर्यंत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना या योजनेवर विश्वास बसलेला आहे.
PM KISAN 18 वा हप्ता : शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट
या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकरी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. माहितीनुसार, हा हप्ता ऑक्टोंबर 2023 च्या शेवटी किंवा दिवाळीच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा हप्ता जून 2023 मध्ये वितरित करण्यात आला होता, त्यामुळे याही वर्षी चार महिन्याच्या नियमित अंतराने पुढील हप्ता येणे अपेक्षित आहे.
18 वा हप्ता दिवाळीच्या अगोदर जमा झाल्यास आनंदाची बातमी.
या योजनेअंतर्गत 18 वा हप्ता हा दिवाळीच्या अगोदर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.
- दिपवाळी आणि पाडवा हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. अशा शेतकऱ्यांना सणासुदीसाठी आर्थिक मदत मिळेल .
- तसेच काही शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
PM KISAN पीएम किसान सन्मान निधी योजना चे फायदे
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने दोन हजार रुपये वेळेवर हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होते.
- तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खत , बियाणे, कीटकनाशके यासारखा अति आवश्यक खर्च भागवण्यासाठी मदत होते.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवन सुधारण्यास मदत होते.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे दिलेले आहेत
- 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेले सर्व शेतकरी पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 वर्षावरील वय असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी पात्र आहे (काही अपवाद वगळता)
PM KISAN या योजनेअंतर्गत अपात्रता व्यक्ती
- संस्थात्मक जमीन धारक
- माझी आणि वर्तमान संवैधानिक पदावरील व्यक्ती
- केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी
- उच्च उत्पादक गटातील व्यक्ती
- व्यवसायिक कर भरणारे व्यक्ती
अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृति वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात.
- त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा दस्तऐवज.
- अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन नोंदणी करू शकतात.
महत्त्वाच्या सूचना
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची नोंद अद्ययात ठेवणे महत्त्वाचे आहे.
- तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.