एक रुपयात बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन फॉर्म असा करा अर्ज

एक रुपयात बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म असा करा अर्ज

महाराष्ट्राचे शासनाने राज्यातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार नोंदणी अंतर्गत विविध योजना आणि लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामध्ये शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ च्या माध्यमातून अर्जदार ऑनलाईन पद्धतीने आपली नाव नोंदणी करू शकतात.या योजनेअंतर्गत कामगारांना सरकारतर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत काम दिले जाते व त्यांना त्या कामासंबंधी संरक्षण किट व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. जर लाभार्थी हा हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असेल तर तो या योजनेमध्ये अर्ज करून लाभ मिळवु शकतो. आपल्याला या योजनेचा लाभ घेयचा असल्यास खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल.या लेखामध्ये योजनेमद्धे अर्ज कसा करावा व कोणती कागदपत्रे आवश्यक लागतात ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज

राज्यातील बांधकाम कामगार यांना सरकारकडून संरक्षण किट खरेदीसाठी 5000 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक सहाय्याचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्याला mahabocw या संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार नोंदणी
बांधकाम कामगार नोंदणी

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी पात्रता

  • योजने अंतर्गत अर्ज करण्याकरिता अर्जदार हा मूळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार असंघटित क्षेत्रात बांधकाम कामगार असावा.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी साठी 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता अर्जदाराकडे कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार करत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराला mahabocw या संकेतस्थळावर नोंदणी करणेगरजेचे आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड.
  2. अर्जदाराचे मतदान कार्ड.
  3. रहिवासी प्रमाणपत्र.
  4. राशन कार्ड ची झेरॉक्स (अर्जदाराचे नाव असणे आवश्यक).
  5. जन्म प्रमाणपत्र.
  6. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
  7. चालू मोबाईल क्रमांक.
  8. बँक पासबुक (पहिले पानाची झेरॉक्स.)
  9. 90 दिवस बांधकाम कामगार काम करत असल्याचे प्रमाणपत्र.

अशी करा ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी.

  • या योजनेअंतर्गत सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ mahabocw वर जावे लागेल.
  • तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज म्हणजेच मुख्यपृष्ठ ओपन होईल.
  • त्या ठिकाणी नवीन नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल.
  • आपल्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये आपल्याला आपला आधार नंबर व मोबाईल क्रमांक भरावा लागेल.
  • त्यानंतर खाली (Process to Form) प्रोसेस टू फॉर्म या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर बांधकाम कामगार योजने अंतर्गत नोंदणी अर्ज आपल्यासमोर उघडेल.
  • आता तुम्हाला या अर्जामध्ये तुमची संपूर्ण विचारलेली माहिती जसे कि (अर्जदाराचे नाव पत्ता मोबाइल क्रमांक बँक खाते तपशील) व्यवस्थित भरून घ्यावी लागेल त्यासोबतच त्या ठिकाणी आवश्यक असणारी कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत.
  • शेवटी सबमिट या पर्यावर क्लिक करून आपण आपला अर्ज यशस्वीरित्या सादर करू शकता.
  • आपला अर्ज सादर झाला याबद्दलचा एसएमएस देखील आपल्या मोबाईल क्रमांक वर पाठवण्यात येईल.

बांधकाम कामगार योजनेतून मिळणारे फायदे.

नोंदणी कृत बांधकाम कामगार यांना सरकार कडून विविध योजनेचा लाभ दिला जातो विमा कवच, मुलांना शिष्यवृत्ती, घरकुल ई व अन्य प्रकारच्या सुविधा दिल्या जातात त्यातील काही खाली देण्यात आल्या आहेत. 

  • बांधकाम कामगाराच्या मुलांना तसेच पत्नीला शिक्षना साठी शिष्यवृत्ती वितरित करणे. 
  • कामगारांना घर बांधणी साठी अर्थ सहाय्य वितरित केले जाते. 
  • पत्नी गरोधर असल्यास मातृत्व लाभ  
  • काम करतांना अपघात झाल्यास लाभ दिला जातो. 
  • कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी अनुदान दिले जाते. 
  • कामगारांना कामाच्या ठिकाणी निवासी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 
  • संसार उपयोगी वस्तु वितरित केल्या जातात. 

Leave a comment