राष्ट्रीय फलोत्पादक अभियान अंतर्गत मशरूम प्रकल्प योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत मशरूम प्रकल्प योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. मशरूम हा पदार्थ खाण्यात वापरले जाते. मशरूम या खाद्यपदार्थाला अळिंबी असे देखील म्हटले जाते. कोणी कोणी याला मशरूम तर कोणी अळिंबी असे म्हणतात. मशरूम हा खाद्यपदार्थाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे शेतकरी मशरूम या पदार्थाचे उत्पादन घेऊन एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतात. ज्यामुळे एक चांगली रोजगाराची संधी निर्माण होईल. या मशरूमचे( अळिंबी ) मानवी आहारात महत्व विचारात घेऊन, तसेच जगातील वाढती मागणी विचारात घेऊन मशरूमच्या निर्मितीस मोठा व्हावा आहे.
Table of Contents
Toggleमशरूम प्रकल्प माहिती
ही एक शक्तीवर्धक आणि औषधीयुक्त वनस्पतीजन्य कवक आहे. यामुळे मानवी आहारामध्ये अळींबीला खूप महत्त्व आहे. या मशरूमचे मानवी आहारात महत्त्व विचारात घेऊन, तसेच जगातील वाढते मागणी लक्षात घेऊन अळींबीच्या निर्यातीस मोठा वावा आहे. राज्यामध्ये या अळींबीचे छोटे मोठे प्रकल्प आहेत, तसेच देशातील हॉटेल्स मध्ये आळिंबीस खूप सारी मागणी आहे, आदिवासी क्षेत्रात आळिंबीस असलेला वा वा. यामुळे राज्यात डाळिंबी बीज उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे अलिंबीवर प्रक्रिया कारक करणाऱ्या उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होणार आहे.
मशरूम प्रकल्प उद्देश
- असे उद्देश आहे की राज्यांमध्ये अळिंबी बीज उत्पादनाचे छोटे प्रकल्प उभारणे.
- तसेच अळींबी प्रक्रिया उद्योगांना कच्चामाल पुरवला जाणे.
- बेरोजगारांना, कृषी क्षेत्रातील पदवी/पदवीधारकांना, होतकरू तरुणांना व उद्योजकांना एक चांगली रोजगाराची संधी निर्माण करून देणे.
- प्रशिक्षण, उत्पादन, बाजारपेठ इत्यादी सुविधा निर्मिती करणे.
या अळींबीचे प्रमुख प्रकार
या मशरूमचे चार प्रकार आहेत.
- बटन मशरूम:
बाजारपेठेमध्ये हे खूप लोकप्रिय आहे. बटन मशरूम हे प्रमाणात उत्पन्न होते.
- क्रिमीनी मशरूम (कच्चे)
हे मशरूम खाण्यामध्ये अधिक स्वादिष्ट असतात ज्यामध्ये प्राणीचा पोषण अधिक असते. या मशरूमचे मुख्य प्रकार अजवैन मशरूम, ऑस्ट्रेलियाची एनोकी आणि प्राय जम्बू सुरू मशरूम आहेत.
- धुली मशरूम
धुली मशरूम हे पण लोकप्रिय आहेत ज्यामध्ये शीताकेनी,पोर्टीबेलो आणि शिमीजी मशरूम आहेत.
- बोटीकल मशरूम
बोटीकल मशरूम हे मशरूम छोटे आणि वाण आहे. ज्यामध्ये औषधी गुण असून शरीरासाठी उपयुक्त आहेत.
मशरूम प्रकल्प (अळिंबी) हा व्यवसाय कोणाला करता येईल
मशरूम उत्पादन हा व्यवसाय कोण सहभाग घेऊ शकतो.
अ. अ. वैयक्तिक शेतकरी ,राज्य सरकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, फलोउत्पादक संघ, स्वयंसहाय्यता गट (किमान 25 सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनी यांना अर्थसहाय्य देण्यात येतील.
मशरूम प्रकल्प अर्थसहाची स्वरूप
अळिंबी उत्पादन प्रकल्प
- या प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रांसाठी खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल रु.20.00 लाख प्रति युनिट इतकी अनुदान पायाभूत सुविधांसाठी देय राहील. खाजगी क्षेत्रांसाठी खर्चाच्या 40% रक्कम रू .8.00 लाख प्रति युनिट इतके अनुदान पायाभूत सुविधांसाठी देय राहील . सदरचे अनुदान प्रकल्प धारित व बँक कर्जाशी निगडित असेल.
मशरूम बीज उत्पादन केंद्र स्थापना करणे
- बीज उत्पादन घटकांसाठी सार्वजनिक क्षेत्रांसाठी खर्चाच्या 100 टक्के रक्कम रू.15.00 लाख प्रति युनिट इतके अनुदान देय राहील. तसेच खाजगी क्षेत्रांसाठी खर्चाच्या 40 टक्के रक्कम रु.6.00 लाख प्रति युनिट इतके अनुदान देय राहील. सदरचे अनुदान प्रकल्प धारित व बँक कर्जाशी निगडित असेल.
मशरूम उत्पादन केंद्र स्थापना करण्यासाठी लाभार्थ्याची निवड
सार्वजनिक क्षेत्र
- सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, कृषी विद्यापीठे, राज्य शासनाच्या इतर संशोधन संस्था व केंद्रशासन यासाठी निर्धारित करीन अशी संस्था इ. चा समावेश राहील. बीजो उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी शासकीय व विद्यापीठ प्रक्षेत्राची निवड करण्यात यावी, याचा सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यास मान्यता देण्यात येईल.
खाजगी क्षेत्र
- वैयक्तिक लाभार्थ्यासाठी या घटकांसाठीचे अनुदान बँक कर्जाशी निगडित असतील तसेच प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के अनुदान देय आहे. सदरील अनुदान बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय राहील.
इतर लाभार्थी
- इतर लाभार्थी साठी राज्य सरकारी संस्था, सरकारी नोंदणी करू संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहाय्यता गट ज्यामध्ये किमान 25 सदस्य असले पाहिजेत, शेतकरी महिला गट तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था/ कंपन्या अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्या बँक कर्जाची अट असणार नाही मात्र त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचे पुरावे सादर करावे लागतील. अशा लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 40% रक्कम रु. अनुदान देय राहील.
मशरूम प्रकल्प अहवाल तयार करणे व सादर करणे
मशरूम उत्पादन प्रकल्पाचे अहवाल दिलेल्या माहितीनुसार तयार करावे. सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय प्रक्षेत्र व कृषी विद्यापीठाने त्यांचे प्रस्ताव मंडळ कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार तयार करून मंडळ कार्यालयास सादर करावे. त्यानंतर मंडळ कार्यालयात प्रस्तावांवर योग्य ती पुढील कार्यवाही करून योग्य प्रस्ताव मंजूर देण्यात येईल संबंधितताना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तथापि या मशरूम उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचे निकष इतर लाभार्थ्याप्रमाणे राहणार आहेत.
मशरूम प्रकल्प आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- प्रकल्प अहवाल
- बँक कर्ज मंजूरी पत्र
- बँक कर्ज एकूण प्रकल्प खर्चाच्या कमाल 50% असावे.
- बँकेचा अप्रायझ रिपोर्ट
- पाचशे रुपये बॉण्ड पेपर वर हमीपत्र
अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
फलोत्पादन विकास अभियान अळींबी बीज जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.