राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल

राष्ट्रीय पोषण माह केंद्र सरकारने प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी ‘या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झालेले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण ,आहार आणि शिक्षण देणे हा उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अहवाल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पोषण भी , पढाई भी ‘या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंमादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..


यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर, एनआयपीसीडी चे उपसंचालक रिटा पटनाईक, सह व्यवस्थापक सिद्धांत संचदेवा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागामार्फत 1 ते 30 सप्टेंबर च्या कालावधीत संपूर्ण राज्यांमध्ये पोषण महा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय पोषण अभियानाच्या या उपक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने राज्यातील अंगणवाड्यात तब्बल 1 कोटी 68 पंधरा हजार 195 उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरला आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त (अंगणवाडी) कैलास पगारे यांनी दिली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदान.


एकात्मिक बालविकास सेवा योजनेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरुवातीच्या काळात मिळेल त्या जागेवर अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.आयुक्त केलास पगारे म्हणाले, महिला व बाल विकासाच्या आहारा संदर्भातील गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या उपोषणासाठी कशी काळजी घेतली पाहिजे. या संबंधित माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत एक ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून पोषण माह साजरा करण्यात येत आहे.

राष्ट्रीय पोषण माह राज्यातील आतापर्यंत उपक्रम

याच्यात आत्तापर्यंत अंगणवाडी स्तरावर एकूण 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 एवढे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

  • एक पेड मॉ के नाम अभियान
  • चिमुकल्यांची वसुंधरा अभियान.
  • ॲनेमिया
  • बाळाचे पहिले हजार दिवस
  • बाळांची वृद्धी सनियंत्रण
  • डायरिया प्रतिबंध
  • पोषण भी, पढाई भी
    असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाची नोंद केंद्र सरकारच्या जन आंदोलन डॅशबोर्डवर घेण्यात आली आहे. त्यानुसारच राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती आयुक्त केलास पगारे यांनी दिली.

राज्यातील एक लाख अंगणवाड्यात अंमलबजावणी

सातव्या राष्ट्रीय पोषण माह मध्ये केंद्र सरकारने, ॲमोनिया, ग्रोथ मॉनिटरिंग, वरचा आहार, पोषण भी पढाई भी आणि उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञांनाचा या पाच संकल्पना निश्चित करून दिले आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अंमलबजावणी राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नगरी क्षेत्रातील एकूण 553 बालविकास प्रकल्पातील 1 लाख 10 हजार 516 अंगणवाडी केंद्रात करण्यात येत आहे.

या घटकांना लाभ

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या घटकांना लाभ.

  • सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील 29 लाख 36 हजार 924 बालके.
  • तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील 24 लाख 62 हजार 690 बालके
  • तर चार लाख 94 हजार 74 गर्भवती महिला.
  • तसेच चार लाख 96 हजार 852 स्तनदा माता.
  • गडचिरोली ,नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या चार जिल्ह्यातील एक लाख 12 हजार 395 किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेत आहेत.
    हा 7 वा राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेची आयुक्त केलास पगारे यांनी दिली.

Leave a comment

Close Visit Batmya360