लखपती दीदी योजना महिलांना मिळणार बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज
केंद्र सरकारकडून महिलांसाठी लखपती दीदी योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत कर्ज वितरित केले जाते. त्यासाठी पात्रता ,अर्ज, नियम व अटी या सविस्तर घटकांची माहिती खाली देण्यात आली आहे.
लखपती दीदी योजना- भारत केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी विविध योजना राबवण्याचे काम करते. या योजना महिलांच्या तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या गरजेनुसार शासन निर्गमित करीत असतं. गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर योजना अमलात आणल्या आहेत. महिला सक्षमिकरण करणे यामुळे महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत.
मागील वर्षी केंद्र सरकारकडून महिलांकरिता लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली. उद्योग क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता योजना अमलात आणण्याचे केंद्र सरकारने धोरण आखलं. उद्योग क्षेत्रात असणाऱ्या महिलांना त्यांचा उद्योग उभारणीसाठी व वाढवण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज देण्यात येते यासाठी ज्या काही अटी आणि नियम आहेत त्या आपण पाहणार आहोत.
लखपती दीदी योजना काय आहे
भारत केंद्र सरकार महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे काम करते. यामध्येच लखपती दीदी योजना चा समावेश होत आहे. या योजनेच्या अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी व त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना कार्य करते.
महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं जातं आणि त्यानंतर त्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून एक लाख रुपये ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येतं. या योजनेअंतर्गत देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजने अंतर्गत जोडण्याचं शासनाचं धोरण आहे.
लाभ घेण्यासाठी या पात्रता असणे आवश्यक
लखपती दीदी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे महिलांना जमा करावे लागणार आहेत. या योजनेची मुख्य अट ज्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहेत त्या महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत कार्यरत नसावा. ज्या महिलांचे कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत आणि अशा महिलांनी जर अर्ज केला तर त्या महिला या ठिकाणी लाभास पात्र राहणार नाहीत.
ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशाच महिला या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र असतील. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा जास्त आहे अश्या महिला या योजनेत अर्ज करण्यासाठी पात्र नसतील.
लखपती योजना असा करा अर्ज
लखपती दीदी योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांना त्यांच्या बचत गटाच्या अंतर्गत व्यवसाय योजना तयार करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचा व्यवसाय आराखडा तयार होताच तो आराखडा बचत गटाकडून सरकारकडे पाठवण्यात येईल आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून त्या अर्जाची तपासणी केली जाईल. त्यानंतर सरकारी अधिकारी यांच्याकडून अर्ज स्वीकारल्यास या योजनेचा लाभ मिळणार असून महिलांना त्यांच्या व्यवसाय तयार केलेल्या आराखड्यानुसार (प्रकल्प अहवाल) आवश्यक असणारी रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येईल. ही वितरित केलेली कर्ज रक्कम महिलांना बिनव्याजी असणार आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.