लाडकी बहिणी योजना पैसे मिळाले नाही तर? काय करावे लागेल.

लाडकी बहिण योजना पैसे मिळाले नाही तर? काय करावे लागेल.

  लाडकी बहिण योजना अंतर्गत ज्या महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा महिलांसाठी काय करावे लागेल याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

लाडकी बहिण योजना पैसे मिळाले नाही

  लाडकी बहिणी योजना अंतर्गत ज्या महिलांनी केलेला आहे , आणि तो अर्ज मंजुरी झालेला आहे . पण या योजनेअंतर्गत 3000 लाभ दिला जाणार आहे तो  मिळाला नाही. त्यासाठी त्या महिलांनी आपले आधार लिंक करून घ्यावे लागेल. आधार लिंक करून घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ दिला जाईल तो मिळण्यास सुरुवात होईल.

लडकी बहिण योजना

   महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना शिंदे सरकारकडून अंतरीम अर्थसंकल्पात 28 जून 2024 पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे . या योजनेच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील महिलांनी अर्ज करण्यास सुरू केलेली आहे. राज्यातील बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि तो ॲप्रोर पण झालेला आहे . तसेच या योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले.

लाडकी बहिण योजना बँक खात्यामध्ये पैसे

   माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम  ही पहिल्या टप्प्यामध्ये 14 ऑगस्ट 2024 पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 हजार रुपये इतका पहिला हप्ता या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेला आहे.

माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये किती अर्ज स्वीकारण्यात आले

   गेल्या दोन ते तीन महिन्यापासून माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी एकूण राज्यांमध्ये एक कोटी 40 लाखाहून जास्त महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहे. तरी सर्व पात्र महिलांचे माझी लाडकी बहीण  योजना जाहीर करण्यात आली ज्या महिलांची नावे यादीमध्ये समाविष्ट असतील . त्या महिलांना या योजनेचा पहिला हप्ता दिला मिळणार आहे पहिला हप्ता 3000 रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली, परंतु या राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी या योजनेचा अर्ज केलेला आहे, अर्ज स्वीकारला  आहे  त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही.

अर्ज स्वीकारला आहे पण तीन हजार रुपये मिळाले नाहीत

   ज्या महिलांना लाडकी बहिण योजना अंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर, तर त्या महिलांनी आपले आधार लिंक लवकरच करून घ्यावे, जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला डीबीटीद्वारे पैसे मिळणार नाही या कारणामुळे पात्र असणाऱ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत पैसे मिळाले नाही.

लाडकी बहिण योजना आधार कार्ड लिंक कसे करावे

   माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जर तुमचा अर्ज स्वीकारला असेल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असेल तर आता तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही . येत्या 15 सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पुन्हा पैशा जमा केले जातील.

   पण जर तुम्हाला या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर, तुम्हाला लवकरात लवकर तुमचे आधार क्रमांक लिंक करून घ्यावे लागेल. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केल्यानंतर येथे 15 तारखेला तुम्हाला योजनेअंतर्गत 4500 रुपयांचा तीन महिना हप्ता दिला जाईल.

पण हे आधार कार्ड लिंक कसे करायचे

   तुम्ही तुमच्या घरी बसल्या आधार कार्ड लिंक करू शकतात , आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला UPI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. खालील दिलेली प्रोसेस पूर्ण फॉलो करा. तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी घरी बसल्या लिंक करू शकतात.

आधार नंबर लिंक करण्याची प्रोसेस

  •  आधार नंबर लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला WWW.npci.org.in या वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर consumer या पर्यावर क्लिक करावी लागेल.
  •  आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला  (BASE) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर आधार सेडिंग फॉर्म उघडेल, येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे बँक खाते असलेल्या बँकाची निवड करावी लागेल.
  • बँक निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचे बँक क्रमांक टाकून घ्यावा लागेल आणि कॅप्चा टाकून पुढेजा  बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुमच्या आधार कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल, त्यानंतर तो OTP तुम्हाला  टाकावा लागेल आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आधार कार्ड पाताळणी नंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक करू शकतात.

NPCI लिंक असताना देखील पैसे आले नाही

  लाडकी बहिण योजना NPCI ज्या महिलांचे अकाउंट दाखवत आहे परंतु त्या बँकेमध्ये त्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. अशा महिलांनी आपले नवीन बँक खाते उघडावे किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये आपले नवीन बँक खाते ओपन करावे. जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे हप्ते त्या अकाउंटवर मिळतील याचं कारण तुमचं Account दाखवत असेल तरीसुद्धा काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे बँक आणि NPCI  पोर्टल एकमेकांशी मॅच करू शकत नसल्यामुळे आपल्याला हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आपण नवीन अकाउंट ओपन करून ते अकाउंट NPCI  लिंक करून घ्यावे जेणेकरून आपल्याला पुढील हप्ते त्या खात्यावर मिळतील. 

Leave a comment

Close Visit Batmya360