मोफत शिलाई मशिन योजना, अर्ज केलाय पण आता पुढे काय करावे ? त्याबद्दल सविस्तर माहिती
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मराठी तंत्रज्ञान माहिती मध्ये स्वागत आहे . पण आज या लेखामध्ये मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या महिलांनी या शिलाई मशीन साठी अर्ज केलेला आहे त्या महिलांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ज्या महिलांनी मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे त्या महिलांचा असा प्रश्न असतो की आता या पुढील प्रक्रिया काय आहे? अर्ज तर केलेला आहे पण यापुढे काय करावे लागेल. लाभ कसा मिळेल. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
अर्ज करण्याविषयी माहिती
राज्यामध्ये बऱ्याचशा महिलांनी मोफत शिलाई मशिन योजना या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर सर्वांना माहीतच आहे की या योजनेचा अर्ज हा स्वतः करता येणार नाही. त्यासाठी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांना CSC सेंटरवर जाऊन मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करावा लागेल. स्वतः या योजनेचा अर्ज करता येणार नाही त्यासाठी आपले सेवा केंद्र येथेच जाऊन करावा लागेल.
शिलाई मशिन योजना हा अर्ज फक्त महिलांनाच करता येतो का?
असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये पडलेला आहे की हा अर्ज फक्त महिलांनाच करता येतो का? तर या योजनेअंतर्गत महिला असो किंवा पुरुष असो दोघांना पण या योजनेमध्ये अर्ज करता येऊ शकतो. ही योजना फक्त शिलाई मशिन अशी काही योजना नाहीये. तर विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन योजना आहे या योजनेअंतर्गत पुरुष किंवा महिला जे काय टेलर शिलाई मशिन काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. पण विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे काही पात्रता आणि निकष दिलेले आहेत त्याचे पालन करून या योजनेअंतर्गत कोणीही लाभ घेऊ शकतो.
शिलाई मशिन योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- रेशन कार्ड ,
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अति आवश्यक आहे .
- ज्या व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
शिलाई मशिन योजना शिलाई मशीन साठी पात्रता
- या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- सरकारी नोकरी करत असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- तसेच एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी आपणास https://pmvishwakarma.gov.in/ या संकेतस्थळावर जाव लागेल.
शिलाई मशिन योजना अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया
जर तुम्ही ग्रामीण भागामधील असाल तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये व्हेरिफिकेशन चीआयडी दिलेली आहे.
ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी विश्वकर्मा ज्या ज्या घटकांना लागू केलेला आहे त्या घटकांनुसार तुम्हाला ॲप्रोर दिलं जातं .
जर मंजूर चा मेसेज नाही आला तर?
ज्या व्यक्तींना ॲप्रोरचा मेसेज नाही आला तर त्या व्यक्तींनी आपले जे कार्यालय असतील. (ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका) त्या कार्यालयात अर्ज केलेली पावती घेऊन जाऊ शकतात .
त्यानंतर तो अर्ज जिल्हा उद्योग केंद्र येथे तुमचा अर्ज जातो आणि तिथे तपासला जातो.
शिलाई मशिन योजना अर्ज ॲप्रोर झाल्यानंतर
ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज ॲप्रोर झालेला आहे. अशा महिलांना ट्रेनिंगचा एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये ट्रेनिंगचा टाइमिंग दिलेला त्या दिवशी त्या टाइमिंग मध्ये तुम्ही ट्रेनिंगला उपस्थित राहणं आवश्यक आहे.
त्या ट्रेनिंगला उपस्थितीत राहिल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग केलेले एक सर्टिफिकेट दिलं जातं.
15 हजार रुपये लाभ कधी दिला जातो
15 हजार रुपयांचा लाभ ट्रेनिंग कंप्लिट केल्यानंतर दिला जातो. हा लाभ पात्र असणाऱ्या महिलांना साहित्य खरेदी करण्यासाठी दिले जाते.
हे पंधरा हजार रुपये महिलांना शिलाई मशीन अंतर्गत वस्तू खरेदीसाठी दिले जातात.
शिलाई मशीन योजनेअंतर्गत कर्ज दिली जाते
या योजनेअंतर्गत हे कर्ज ज्या ज् महिलांना पंधरा हजार रुपये साहित्य खरेदीसाठी लाभ दिलेला आहे अशा महिलांना हे कर्ज दिले जाते. बँकांकडून हे कर्ज देण्यात येते या कर्जासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे हे बँकांनी ठरवल्याप्रमाणे डॉक्युमेंट द्यावी लागतील. डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये असे कर्ज दिले जाते.
या कर्जाचा लाभ
या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये कर्ज दिले जाते पण हे कर्ज पहिल्या टप्प्यांमध्ये 1 लाख रुपये असे दिले जाते या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये त्याच व्याजदरात हे कर्ज दिले जाते.
पहिल्या वर्षी एक लाख आणि दुसऱ्या वर्षी दोन लाख असे दोन वर्षांमध्ये तीन लाख रुपये कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते.
At waranga po. Dongargav t. Dist nagpur St. Maharashtra