ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
2024-25 हंगामात इथेनॉल निर्मितीला मंजुरी
2024- 25 च्या नव्या हंगामात केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ऊसाचा रस, सिरप, आणि हवी मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखान्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगल्या प्रकारचा भाव मिळेल अशी अपेक्षा आहे .
इथेनॉल निर्मितीवर बंदी का घालण्यात आली होती
केंद्र सरकारने साखरेच्या टंचाईमुळे बंदी घालण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये साखरेची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. साखर कारखान्याच्या उत्पादनावर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीमुळे मोठा परिणाम झाला होता, ज्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांच्या ऊसाला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ही नाराज झाली होती
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्टे
पेट्रोलमध्ये 100% इथेनॉल मिश्रण करण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवले आहेत. जे 2025 पर्यंत 20% करण्याचे आहे. त्यामुळे इथेनॉल ची मोठ्या प्रमाणात गरज आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला मंजुरी दिलेली आहे.
साखर उत्पादक आणि निर्यातीत अडचणी
मागील पाच ते सात वर्षांमध्ये उसाचे क्षेत्र आणि साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परंतु मात्र साखरेचा निर्यातीवर निर्बंध असल्याने साखरेचा पुरेसा उठा होत नाही. साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात साठ आहे, ज्यामुळे कारखान्यांना अडचणी येत आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना फायदा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यामुळे साखर कारखान्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. उसाचा रस वापरून इथेनॉल निर्मिती सुरू केल्याने साखर कारखान्याच्या उत्पत्रात वाढ होईल आणि आता शेतकऱ्यांना पण फायदा होईल. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.