गॅस सिलेंडर वरती 20 सप्टेंबर पासून नवीन नियम लागू

गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना भारतातील एलपीजी गॅस सिलींडर मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे. 20 सप्टेंबर गॅस सिलेंडरच्या किमतीत नवीन नियम लागू करण्यात येणार असून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे . या लेखामध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलिंडर याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
गॅस सिलेंडर

नवीन नियम आणि सवलती

20 सप्टेंबर पासून एलपीजी गॅस सिलिंडर साठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता सध्या उज्वला योजनेअंतर्गत महिलांना प्रति सिलेंडर 300 रुपयांचे अनुदान देण्यात येत होते, परंतु 20 सप्टेंबर पासून पुढे सर्व ग्राहकांना 300 रुपये सबसिडी लाभ मिळणारच आहे. परंतु माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना अन्नपूर्णा योजने अंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. म्हणजे आता राज्यातील नागरिकांना एका सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे, परंतु सवलतीमुळे नागरिकांना ते मोफत उपलब्ध होणार असून, अन्नपूर्णा योजना एका कुटुंबातील एक वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहे

सबसिडी पात्रता

उज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना दिले जाणारे 300 रुपयांची सबसिडी कायमस्वरूपी राहणार आहे परंतु, त्याला भरण्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की, ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर उज्वला योजने अंतर्गत दिली जाणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उज्वला योजनेअंतर्गत सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

3 गॅस सिलेंडरचा लाभ

तीन गॅस सिलेंडरचा लाभ हा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना अन्नपूर्णा योजने अंतर्गत एका वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

ई – केवायसी चे महत्व

ई – केवायसी प्रक्रियेबद्दल महत्त्वाची सूचना आहे की, आपली ई – केवायसी करून घेणे आवश्यक आहे. सरकारने या अगोदर 31 मार्च पर्यंत ई – केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिलेली होती, परंतु ई – केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर त्या लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ दिला जाणार नाही त्यासाठी सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी ई – केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.

राज्यातील नागरिकांसाठी खुशखबर

राज्यातील गॅस वापरकर्त्यांना उज्ज्वल योजनेचा लाभ तर मिळणार आहेच, पण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राहिलेली रक्कम मिळणार अनुदान स्वरूपात मिळणार आहे. त्या मुळे महाराष्ट राज्यातील महिलांना आता मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे,लक्षात घ्या हे मोफत गॅस सिलेंडर एका वर्षात फक्त तीनच दिले जाणार आहेत.

Leave a comment