farmer waver महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी या विषयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. निसर्गाचा कोप, दुष्काळ, अतिवृष्टी, पिकाला मिळणारे मातीमोल भाव या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्ज माफी मिळेल का?
यावर शासनाकडून शेतकऱ्यांच्या याद्या देखील मागवले जात आहेत. याचा आढावा घेऊन शासन निर्णय घेईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना आहे, परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांना खरंच कर्ज माफी मिळू शकते का ? आणि जरी मिळाली तर कधी मिळेल याबाबत स्पष्टीकरण व शेतकरी आंदोलक नेते रविकांत तुपकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
farmer waver रविकांत तुपकर आंदोलन
शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सिंदखेड येथील मासाहेब जिजाऊ यांच्या राजवाडा समोर 4 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनामधील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सोयाबीन कापूस भावा दरवाढ पिक विमा अतिवृष्टीचा शंभर टक्के नुकसान भरपाई तसेच शेतीला जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी मजबूत काम पाहून यासह अशा अनेक मागण्यासाठी अन्नत्याच आंदोलन सुरू केले.
रविकांत तुपकर यांची अन्नत्याग आंदोलन दिनांक 07 सप्टेंबर रोजी स्थगित केले गेले यामध्ये राज्य सरकारने तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेत दिनांक 11 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक निश्चित करण्यात आली त्यामुळे तुपकर यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले.
हे वाचा : कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली
बैठकीत काय निर्णय झाला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यांचे शिष्टमंडळ दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये दाखल झाले त्यामध्ये त्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत झाली या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांच्याकडून त्यांच्या मागण्यांमध्ये बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला; परंतु कर्जमाफी या मुद्द्यावर सद्यस्थितीमध्ये तरी राज्याची अर्थव्यवस्था कर्जमाफी करण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती अजित दादा पवार यांनी दिली.
रविकांत तुपकर यांचा शिष्ट मंडळ व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बैठक झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली की शासन पिक विमा, अनुदान, पिकांचे हमीभाव, याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे परंतु शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी (farmer waver) करण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याची महिती दिली.
कर्जमाफी मिळू शकते का ?
शेतकऱ्यावर येणारे अस्मानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तसेच विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी वारंवार दिसून येत आहे. त्यासोबतच विरोधकाने देखील या मुद्द्यावर चांगली चर्चा गाजवली आहे परंतु शासन कर्जमाफीची घोषणा करू शकता का किंवा कर्जमाफी (farmer waver) देऊ शकते का ?
शासन जरी कर्जमाफी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांची यादी गोळा करत असेल तरीसुद्धा सद्यस्थितीमध्ये तरी कर्जमाफी करणे शासनाला शक्य होणार नाही. याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे कर्जमाफी करायची त्याची घोषणा व अधिवेशन मध्ये या मुद्द्याची चर्चा करावी लागते. ज्या पद्धतीत आपण मागील कर्ज माफी राबवल्याची प्रक्रिया पहिली. परंतु सध्या निवडणुका जवळ आल्यामुळे तरी फक्त घोषणा केली जाऊ शकते परंतु याची अंमलबजावणी सद्यस्थिती होणार नाही.
शासनाकडून निवडणूक समोर धरून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते. परंतु शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याची व कर्जमाफी करण्याची प्रक्रिया खूप मोठी असल्यामुळे आता सरकार फक्त घोषणा करू शकते. अमलबजावणी करण्यासाठी सरकार कडे वेळच शिल्लक नाही. पण घोषणा म्हणजे कर्ज माफी नाहीच..
farmer waver कर्जमाफी अमाबाजवणी करण्यासाठी निवडणूक पूर्ण झाल्यावर सरकार स्थापन केले जाईल व त्या सरकार च्या माध्यमातून पुढील प्रक्रिया केली जाईल. परंतु सध्या तरी नैसर्गिक संकटाने हवालदिल असणाऱ्या, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या, या जगाच्या पोशिंद्याल सरकार कडून कर्ज माफी नाहीच.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “farmer waver : शेतकऱ्यांना कर्ज माफी नाहीच.”