राज्यात मोबाईल ॲप द्वारे होणार पशु गणना, उद्यापासून योजना होणार सुरू

राज्यात मोबाईल ॲप द्वारे होणार पशु गणना, उद्यापासून योजना होणार सुरू

     आजच्या या लेखामध्ये मोबाईल ॲपद्वारे होणार पशुगणना याविषयी माहिती पाहणार आहोत. याव वर्षीच्या पशुगणनेला उद्यापासून होणार आहे सुरुवात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून असे कळविण्यात आले आहे 1 सप्टेंबर पासून पशु गणना करण्यात येणार आहे. यावर्षीची पशुगणना एकाच वेळी संपूर्ण राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. तसेच  ही पशु गणना यावर्षी 21वी आहे. ऑनलाइन पद्धतीने यावर्षी मोबाईलच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार आहे  . पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारी केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी दिलेली आहे.

   देशातील जनतेची जशी  जनगणना केली जाते, तशीच दर पाच वर्षांनी पशु गणना केली जाते. ही पशुगणाना  पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षाला केली जाते . यावर्षी ही पशुगणना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे, ती पूर्णपणे पेपरलेस आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्मार्टफोनचा वापर पशु गणनेसाठी केला जाणार आहे.

   या अगोदर झालेल्या पशुगणनेमध्ये म्हणजे 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशु गणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दीले होते . यावर्षीच्या पशु गणनेसाठी वेळेची बचत व्हावी म्हणून एका विशिष्ट ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. गेल्या पाच वर्ष अगोदरची पशु गणना नोंदवहीत केली जात होती. परंतु नोंदवहीत अनेक रकाने होते जे ते भरताना बराचसा वेळ जात होता. परंतु यावर्षी होणाऱ्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, तसेच वेळेची बचत  करण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग केलेला आहे . या स्मार्टफोनमध्ये एका  ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून सॉफ्टवेअर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे.

    पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची पशुसंवर्धन विभागाने प्रगणक म्हणून नेमणूक केलेली आहे. या प्रगणकांना डॉ. शशांक कुलकर्णी यांनी डॉ. शेजाळ , डॉ. बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन पंधरवड्यात तालुकानिहाय मार्गदर्शन केले आहे.

pexels-photo-422202-422202.jpg

या मोहिमेत या जनावरांची गणना

    या मोहिमेत या जनावरांची गणना गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी , अश्व, कुक्कुट , वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री याची गणना केली जाणार आहे. गणना केलेल्या आधारावर शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. तसेच निधीची उपलब्धता केली जाते.

मागच्या वेळेच्या पशु पशुगणना जिल्ह्यात

   मागच्या वेळेच्या पशु पशुगणना जिल्ह्यात 

  • गाय वर्ग -5 लाख 38 हजार 572
  • म्हैस वर्ग- 94 हजार 430
  •  शेळ्या-4 लाख 31 हजार 182
  •  मेंढ्या – 88 हजार 244
  •  वराह – 10 हजार 646
  • असे एकूण 11 लाख 63 हजार 74 पशु गणना झाली होती.

ग्रामीण भागासाठी 205 प्रगती नियुक्त

    ग्रामीण भागासाठी दर तीन हजार कुटुंबा मागे एक, तर शहरी भागासाठी चार हजार कुटुंबामागे एक अशी प्रगणकांची नियुक्ती केली आहे.  तर तीन प्रगणकांमागे एका प्रेक्षकांची पर्यवेक्षकाची नेमणूक केली आहे.

यातून जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातील

  • 1255 गावासाठी 205 प्रगणक व 61पर्यवेक्षक असून

शहरी भागासाठी

  • 76 प्रगणक व 21 पर्यवेक्षक असे एकूण 281 प्रगणक व 82 पर्यवेक्षक नेमलेले आहेत.

   पशुगणनेची माहिती भरताना प्रगणकांनी स्वतःचा मोबाईल वापरायचा आहे. त्यासाठी त्यांना मानधन दिले जाणार आहे.

1 thought on “राज्यात मोबाईल ॲप द्वारे होणार पशु गणना, उद्यापासून योजना होणार सुरू”

Leave a comment