breaking news एकाच दिवशी एकाच गावात आणले 15 ट्रॅक्टर

15 ट्रॅक्टर सध्याच्या काळामध्ये शेती करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. कारण की सध्याच्या काळामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करणे हे परवडत नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करत असतात . परंतु, एकाच दिवशी एकाच गावातील शेतकऱ्यांनी आणले 15 ट्रॅक्टर.

15 ट्रॅक्टर छत्रपती संभाजी नगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर येथील एकाच गावात एकाच दिवशी 15 ट्रॅक्टर आणले. ही घटना संभाजीनगर येथील नेवरगाव – हैबतपूर गावातील ही घटना आहे. त्या गावातील व्यक्तींना विचारले त्या मागचे कारण काय. त्या व्यक्तीने असे सांगितले की सध्याच्या काळामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करणे परवडत नाही, तसेच शेतीसाठी लागणारे मजूर, मिळत नाही. सध्याच्या पिढीला जनावरांची कसरत निघत नाही ते सांभाळायचे त्यांना खायला प्यायला वेळेवर द्यायचं . बैलांची मशागत आणि कामासाठी लागणारे मजूर हे वेळेवर मिळत नसल्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांनी असा मार्ग शोधला आहे . गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी असा विचार केला की शेती पण करता येईल आणि मजुरी पण कमी लागेल त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल 15 ट्रॅक्टर खरेदी केले. या ट्रॅक्टर खरेदीची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पिक पाहणी मुदतवाढ


छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नेवरगाव- हैबतपूर या गावातील ही घटना आहे. या गावातील शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी मजूर पण कमी लागेल आणि शेती पण होईल यावर सर्वोत्तम पर्याय निवडलेला आहे. गावातील शेतकऱ्यांनी सर्वोत्तम पर्याय म्हणून ट्रॅक्टर निवडलेले आहे. शेतात लागणाऱ्या मजूर ची समस्या या शेतकऱ्यांना सतावत असल्याने गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. या गावात एकाच दिवशी तब्बल 15 ट्रॅक्टर आणण्यात आले.

असा रेकॉर्ड करणारे पहिलंच गाव

या गावातील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की , कापूस लावणी, सोयाबीन काढणे, गहू काढणे, यासारखी इत्यादी कामे शेतीतील लागणारा मजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे आणि वाढलेला रोजगार या सर्व समस्येला कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन एकाच दिवशी , एकाच वेळी ट्रॅक्टर गावात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 15 छोटे ट्रॅक्टर खरेदी ग्रामीण भागातील पहिलीच अशी घटना आहे की एकाच वेळी एका गावातून एवढ्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ असावी, असं शेतकरी सांगतात.

Leave a comment