otp compulsory gas cylinder एलपीजी कंपनी द्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल तेव्हा ओटीपी सांगावा लागेल. तेव्हा गॅस सिलेंडर दिला जाईल व तुमची डिलिव्हरी यशस्वी पूर्ण होईल. पण जर जेव्हा मोबाईल वरून सिलेंडर बुक करा आणि तो मोबाईल धारक घरी नसेल तर त्यावेळेस तुमची तारांबळ उडू शकते. त्यामुळे येथून पुढे गॅस सिलेंडर घेत असताना नियोजन करावे लागेल. त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झालयाचा मेसेज घरातील इतरांना पाठवून ठेवावा लागणार आहे.
हे वाचा : लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर
otp compulsory gas cylinder इथून मागे तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरची जशी बुकिंग करत होतात, इथून पुढेही त्याच पद्धतीने फोनवरून बुकिंग करावी लागेल. पण मात्र ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत . नवीन नियम म्हणजे सिलेंडरच्या डिलिव्हरी साठी ओटीपी अति आवश्यक असणार आहे . पण मात्र या नवीन नियमाची ग्राहकांना चांगलीच अडचण होईल आणि सिलेंडर साठी वितरकासोवत अनेक वेळा खटके उडू शकतील, अशी शक्यता ग्राहक हक्कचे डॉ. श्याम भुतडा व्यक्त करतात.
सध्याची पद्धत अशी होती की घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यानंतर काही दिवसानंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करायचे. परंतु आता यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. ओटीपी शिवाय सिलेंडरची होम डिलिव्हरी होणार नाही. या अगोदर पण हा नियम होता, परंतु तो नियम आता अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या ग्राहकांनी आता सिलेंडर ऑनलाईन बुक केला आहे त्या ग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी ज्यावेळेस गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यानंतर ग्राहकांना तो ओटीपी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला दाखवावा लागेल. नाही दाखवला तर ग्राहकांना हा सिलेंडर दिला जाणार नाही.
otp compulsory gas cylinder गॅस सिलेंडर बुकिंग व डिलिव्हरीची नवीन प्रक्रिया
otp compulsory gas cylinder मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसची बुकिंग करण्यावर ही प्रक्रिया थांबणार नाही. बुकिंग नंतर ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ज्यावेळेस सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी गॅस एजन्सीचा कर्मचारी घरी येईल, तेव्हा त्या व्यक्तींसोबत हा ओटीपी शेअर करणं गरजेचे असेल. जर ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट नसल्यास डिलिव्हरी पर्सनल ॲपच्या माध्यमातून रियल टाईम अपडेट करू शकतात. म्हणजेच तुम्ही डिलिव्हरीच्या वेळी ते ॲपच्या साह्याने तुम्ही मोबाईल नंबर डिलिव्हरी बॉय च्या साह्याने अपडेट करू शकाल. ॲपच्या माध्यमातून रिअल टाईम बेसिसवर मोबाईल क्रमांक अपडेट होईल. तसेच त्यानंतर त्याच क्रमांकावर कोड जनरेट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. हा नवा बदल कसोशीने अमलात आणला जाणार आहे.
सिलेंडर वितरकांचे म्हणने काय ?
otp compulsory gas cylinder असे म्हटले जाते की ही नवीन पद्धत खूप डोकेदुखी आहे. कारण की ज्या व्यक्तीने मोबाईल वरून नोंदणी केलेली आहे तो व्यक्ती जर घरी नसल्यास डिलिव्हरी बॉय सिलेंडर देणार नाही . पण आणि घरांमध्ये असे होत असते की त्या घरातील कर्ता माणूस बाहेर जर असेल आणि त्या घरात त्या व्यक्तीचे आई-वडील खूप वृद्ध असतील जर त्या वृद्ध आई-वडिलांना हा ओटीपी सांगता आला नाही तर सिलेंडर दिला जाणार नाही.
otp compulsory gas cylinder याविषयी बोलताना इब्राहिमजी आदमजी गॅस एजेन्सीचे आसिफ जाहिद म्हणाले की आता अनिवार्य झाले आहे. पण ही सिस्टीम खूप डोकेदुखी ठरणार असल्याचे आम्ही वितरकरांनी कंपन्यांना कळविले होते. पण काळानुसार लोक समजून घेतील. तक्रारी हळूहळू दूर होतील. त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. मुख्य म्हणजे या पद्धतीबाबत जागरण आवश्यक आहे. तसेच घ्या जोडणी असणाऱ्या कुटुंबाने वितरकाकडे अधिकृत एकच नंबर नोंदवावा. कारण एका नंबर वर नोंदणी झाल्यास त्यावरून एक महिना झाल्याशिवाय दुसऱ्या वेळी सिलेंडर मागणी करता येणार नाही.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.