सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य महाराष्ट्र तरी राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार.

महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार.

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याला सर्वोतकृष्ट कृषि राज्य पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला त्या बद्दल त्यांनी आनंद ही व्यक्त केला. आणि राज्यातील शेतकरयऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्रातील बांबू उत्पादनाबद्दल माहिती देत बांबू उत्पादनाची विशेष खाशियत सांगितली. 

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबूची विशेषत: सांगितली. त्यात त्यांनी बांबू लागवडी बाबत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे सांगितले व देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार

ज्या राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या त्याच राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार.

    महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाच्या पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला असतानाच व देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असणाऱ्या राज्याला देशाचा सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार मिळतो ही एक आश्चयाचीच बाब मानवी लागेल. 

    1 जानेवारी ते 31 मे दरम्यान महाराष्ट्र राज्यात 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. याच पाच महिन्याच्या कालावधीत सुमारे सरासरी प्रत्येक महिन्याला 210 शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले. 

ह्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यास सरकारला अपयश येत असतानाच केंद्र सरकार कडून महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि पुरस्कार देण्यात येतो ही नक्कीच नवल वाटण्या सारखी गोष्ट आहे. 

महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कृषि पुरस्कार वाटपास कोण कोण उपस्थित

पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान , अॅग्रिकल्चर टूडे समूहाचे अध्यक्ष एम जे खान , राज्याचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते. 

Leave a comment