मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
अपना आज या योजनेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्या वीज बिला पासून सुटका होणार आहे. या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहे याचा लाभ हा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून अर्थसंकल्पात असे सांगितले की 46 लाख 6 हजार कृषी पंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा केली. याकरिता 14 हजार ,761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 रोजी |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | अर्ज करण्याची गरज नाही |
योजनेचे वैशिष्ट्ये | राज्यातील 46 लाख हजार कृषी पंप धारकांना मोफत वीज दिली जाणार आहे |
लाभ | कृषी पंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी |
मुख्यमंत्री बळीरा वीज सवलत योजना माहिती
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे वीज बिलापासून सुटका केली. याची घोषणा 28 जून अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. याचा लाभ 7.5 एचपी मोटर पंपची वीज माफ केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अगोदरचे विज बिल थकीत आहेत ते विज बिल शेतकऱ्यांना भरावे लागतील या योजनेच्या माध्यमातून ते बिल माफ केले जाणार नाही. पण इथून पुढचे जे वीज बिल आहे ते माफ केले जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना वीज बीला पासून सुटका मिळणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांना दिला जाईल.
- याचा लाभ 7.5 एचपी मोटर पंपाचे वीज माफीसाठी पात्रता असेल
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अटी व नियम
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असायला हवा.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत थकीत वीज बिल माफ केले जाणार नाही.
- इथून पुढचे वीज बिल मोफत असेल.
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 7.5 विद्युत क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज दिली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत 7.5 एचपी मोटार पेक्षा जास्त म्हणजे 10 एचपी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत बळीराजाला वीज सवलत मोफत दिली जाणार आहे हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 46 लाख हजार कृषी पंप धारकांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे त्यांनी अर्थसंकल्पात या योजनेकरिता 14 हजार, 761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे म्हटले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची विज पासून सुटका व्हावी असे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे. याचा लाभ हा शेतकऱ्याला होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे 7.5 एचपी मोटर पंपा आहेत त्या शेतकऱ्यांची वीज माफ केली जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अर्ज करण्याची पद्धत
या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी व्यक्तींना अर्ज करण्याची गरज पडणार नाही. कृषी पंपाची वीज जोडणी घेताना ती वीज जोडणी कृषी पंपाची आहे याची माहिती विद्युत विभागाकडे नमूद असते. त्यामुळे कोणती वीज जोडणी कृषी पंपाचे आहे व ती किती एचपी पंपाची आहे याची माहिती शासनाकडे या अगोदरच उपलब्ध असते यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची गरज पडणार नाही.7.5 कृषी पंप एचपी चे बिल त्यांच्याकडे अगोदरच उपलब्ध आहे त्या माहितीनुसार मोफत विज दिली जाणार आहे.
धन्यवाद
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
2 thoughts on “मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना”