किसान क्रेडिट कार्ड योजना
Kisan credit card Yojana: आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे या भारतामध्ये जास्तीत जास्त राज्यांमध्ये शेती हा व्यवसाय करता. तर आपण आज अशीच एका योजनेची माहिती घेणार आहोत जी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ही योजना सरकारने शेतीसाठी लागणारे कर्ज. उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध व्हावे असा या योजनेचा उद्देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टीवर अवलंबून असते. ज्यामध्ये हवामान हा मुख्य घटक आहे, अनेक वेळा वारे, पाऊस, गारपीट, अतिवृष्टी अशा या बदलत्या वातावरणामुळे पिकाचे खूप मोठे प्रमाणात नुकसान होते. नुकसान झाल्यामुळे सरकारला कर्ज काढावे लागते. मुलगी संस्थेकडून उच्च व्याजरांनी कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. चला तर आपण आज या योजनेमध्ये योजनेची माहिती, उद्देश काय आहे ,पात्रता , या किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक लागणारे कागदपत्रे, या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.
योजनेचे नाव | किसान क्रेडिट कार्ड योजना |
कोणामार्फत राबवली जाते | भारत सरकार द्वारे |
विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
उद्देश | पिक पेरणी पासून पिक काढणी पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे. |
लाभ | शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
अधिकृत संकेतस्थळ |
किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती
किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्ड या योजनेची सुरुवात भारत सरकारने 1998 मध्ये केलेली आहे. या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्यात येतील.
किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी शेती विषयी खरेदी करण्यास मदत होईल. ही योजना वाणिज्य बँक, लघु वित्त बँक आणि सरकारी संस्थांद्वारे राबविण्यात येते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे, शेतकऱ्यांना उच्च व्याजदरातून कर्ज देणाऱ्या बँकांपासून सूट मिळेल . किसान क्रेडिट कार्ड साठी व्याजदर हा 2% किंवा 4% च्या दरम्यान आहेत. हा कमी व्याजदर दिल्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करण्यास मदत होते. किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 1 लाख ते 60 हजार रुपयांचे कर्ज दिले जात आहे. या कर्जाच्या आधारे शेतकरी आपल्या शेतीमध्ये लागणाऱ्या आवश्यक वस्तू आणून शेतीची चांगल्या प्रकारे काळजी घेईल.
किसान क्रेडिट कार्ड सर्व भारतीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि सरकारी बँकामार्फत उपलब्ध आहेत. या योजनेमध्ये 2012 पासून आणखीन सुधारणा करण्यात आली,ज्याचा उद्देश प्रक्रिया सुलभ करणे आणि इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड सुलभ करणे आहे. यामध्ये सामान्य बँकिंग प्रक्रिया आणि औपचारिक माहिती नसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक साधी कागदपत्रे आणि क्रेडिट वितरण प्रक्रिया आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्देश
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी दीर्घकाळासाठी कर्ज मिळेल.
- या योजनेद्वारा पीक काढण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
- किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना पिक लागवड करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
- तसेच या योजनेमुळे पिकांच्या कापणीनंतर खर्च करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
- शेतकऱ्याच्या जीवनातील दैनंदिन घरगुती गरजा या योजनेतून पूर्ण होतील.
- शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी या योजनेतून खूप मोठा फायदा होणार आहे असा या सरकारचा उद्देश आहे
- किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होतील.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
- किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक मदत लागल्यास कर्ज घेऊन आपली गरज भागवू शकतो
- KCC या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बी बियाणे, खते, कीटकनाशके शेतीसाठी लागणारे उपयुक्त वस्तू आपण घेऊ शकतो.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्ज कोणत्याही हमीशिवाय घेता येते.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन वर्षांमध्ये पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेता येते.
- किसान क्रेडिट कार्ड ची वैधता ही पाच वर्षासाठी आहे.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते.
- किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
किसान क्रेडिट कार्ड योजना पात्रता
- वैयक्तिक शेतकरी जे मालक/शेती करणारे आहेत ते पात्र आहे
- वाटेकरी ,भाडेकरू शेतकरी
- जे शेतकरी पिकांच्या उत्पादनात किंवा पशुपालना सारख्या क्रियाकलापामध्ये असलेले शेतकरी.
- मत्स्य शेतकरी, मच्छीमार स्वयंसहायता गट , आणि महिला गट पात्रता आहेत.
- शेअरपिक ,शेतकरी, भाडे करून शेतकरी इत्यादीचे स्वयं – सहाय्यता गट.
- या योजनेसाठी कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि मेंढ्या, ससे, शेळ्या, डुकराचे पालन पोषण करनारे पात्रता आहेत.
- दुग्ध उत्पादक शेतकरी, आणि भाडेकरू शेतकरी तुझे मालकीचे, भाडेतत्वावर तुला भाड्याने शेड येतात.
हे सर्व या योजनेसाठी पात्र असतील.
किसान क्रेडिट कार्ड योजनेची वैशिष्ट्ये
- तीन लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले जाऊ शकते आणि उत्पादन विपणन कर्ज मिळू शकते.
- योजनेसाठी पात्र शेतकरी परवडणाऱ्या व्याजदरसह किसान क्रेडिट कार्ड बचत खाते जारी करतील.
- या योजनेअंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीसाठी, क्रेडिट उपलब्ध असेल आणि कापणी हंगामानंतर परतफेड केली जाऊ शकते.
- काढणीनंतरच्या हंगामात झालेल्या कोणत्याही खर्च सह शेतकरी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करेल.
- या क्रेडिट कार्डची वैधता पाच वर्षांची आहे.
- लाभार्थी शेतकऱ्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास वाढवता खर्च अनुषंगिक खर्च किंवा पिक पद्धतीत बदल इत्यादी समाविष्ट करण्यासाठी कार्ड मर्यादा आणखीन वाढवली जाईल
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- अर्जदार व्यक्तीचे 7/12 व 8 अ
- बँक खाते क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्याची पद्धत
किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी ऑफलाईन ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो.
ऑफलाइन
किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी फॉर्म डाऊनलोड करा.फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.Kcc form
फॉर्म ओपन केल्यानंतर त्यावर आपण आपली माहिती, कर्जाची रक्कम, थकीत असलेले आपल्याकडील कर्जाचा तपशील व आपल्या शेतीसंबंधी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी.
अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर आपण हा अर्ज संबंधित बँक मध्ये जमा करावा.
आपण हा अर्ज बँकेमध्ये जमा केल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला बँकेत किंवा पोस्टद्वारे घरपोच मिळेल.
अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आता तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.
त्यामध्ये पर्यायाची सूची असतील. त्यामधून किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा.
त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर पुढच पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला अर्ज करा हा पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल.
या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा . त्यानंतर तुम्हाला अर्जाच्या संदर्भात क्रमांक पाठवला जाईल, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर बँक पुढील प्रक्रिया करून तुम्हाला कर्ज देईल.
अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सतत विचारले जाणारे प्रश्न
- किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी व्याजदर किती?
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते.
- या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा किती आहे?
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत कर्ज दिले जाते.
- किसान क्रेडिट कार्ड कसे मिळावावे?
- किसान कार्ड ऑफलाईन मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल. किंवा आधी कृती वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. या लेखामध्ये दोन्हीही प्रोसेस दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही हे कार्ड मिळवू शकत.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात कधी झाली?
- किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात 1998 मध्ये झाले.
- या योजनेसाठी लाभार्थी कोण आहे?
- या योजनेसाठी लाभार्थी देशातील नागरिक आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ काय आहे?
- किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे आहे.
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना माहिती सांगा किंवा हा लेख त्यांना शेअर करा.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
3 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड योजना शेतीसाठी दिले जाते कर्ज”