अन्नपूर्णा योजना कोणाला मिळणार लाभ ? पहा कुणाला किती मिळणार पैसे : CM Annapurna Yojana Labharthi 2024

CM Annapurna Yojana Labharthi 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी केलेला आहे या योजनेनुसार राज्यांमधील पंतप्रधान उज्वला योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विधिमंडळ अधिवेशनामध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेनुसार महाराष्ट्र मधील पंतप्रधान उज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली होती आता सरकारने माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांचा समावेश देखील या योजनेमध्ये केलेला आहे एका कुटुंबातील एका लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे वाचा : लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर लाभ

CM Annapurna Yojana Labharthi 2024 संपूर्ण माहिती :

पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप तेल कंपनीकडून केले जाते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत गॅस सिलेंडर चे वाटप तील कंपनीकडून करण्यात येणार आहे.

CM Annapurna Yojana Labharthi 2024 पंतप्रधान उज्वला योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते आणि नंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्वला योजनेमार्फत दिली जाणारी सबसिडी ला वर्गांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून 530 प्रति सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र कोण ?

  • CM Annapurna Yojana Labharthi 2024 अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केस तोडणी महिलेच्या नावावर ती असणे बंधनकारक आहे
  • राज्यांमधील पंतप्रधान उज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला देखील या योजनेअंतर्गत पात्र ठरतील
  • रेशन कार्ड नुसार एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील
  • सध्या राज्यात पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत
  • या योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

CM Annapurna Yojana Labharthi 2024 कुणाला किती मिळणार पैसे ?

  • उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपनी मार्फत केले जाते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटप येतील कंपनीमार्फत केले जाईल
  • उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानात व्यतिरिक्त राज्य सरकार 530 प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल
  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 830 किंवा जिल्ह्यानुसार सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहेत.

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात राहणाऱ्या तसेच कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस (LPG) जोडणी वाटप करणे आहे. स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने 1 मे 2016 रोजी ही केंद्र सरकार कडून ही योजना सुरू करण्यात आली.

उद्दिष्ट

उज्ज्वला योजनेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  1. स्वच्छ इंधनाचा वापर: ग्रामीण भागात लाकूड, कोळसा आणि शेणाच्या पोळी यांसारख्या पारंपारिक इंधनांच्या जागी एलपीजीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे. यामुळे वायू प्रदूषण कमी होईल आणि आरोग्याच्या समस्याही सुधारतील.
  2. महिला सक्षमीकरण: या योजनेचा मुख्य फायदा महिलांना होणार आहे, कारण बहुतेक घरांमध्ये महिला स्वयंपाकघरातील काम करतात. एलपीजी वापरल्याने त्यांचा वेळ वाचेल आणि आरोग्य धोके कमी होतील.
  3. आर्थिक सहाय्य: आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन आणि प्रारंभिक सिलिंडर अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिक भारापासून मुक्तता मिळते.

योजनेची वैशिष्ट्ये

  • लाभार्थी निवड: उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड सामाजिक आणि आर्थिक जात जनगणना (SECC) २०११ च्या आधारे केली जाते. ज्या कुटुंबांकडे आधीच एलपीजी कनेक्शन नाही त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
  • अनुदान: योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या खरेदीवर सबसिडी मिळते. याव्यतिरिक्त, प्रारंभिक कनेक्शनसाठी आवश्यक साधने देखील प्रदान केली जातात.
  • समुदाय सहभाग: सरकारने या योजनेच्या प्रचारासाठी स्थानिक समुदाय, महिला संस्था आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे, जेणेकरून जनतेमध्ये जागरूकता वाढेल आणि जास्तीत जास्त कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येईल.

यश आणि प्रभाव

CM Annapurna Yojana Labharthi 2024 उज्ज्वला योजनेने देशभरातील 8 कोटींहून अधिक कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिले आहेत. यामुळे केवळ महिलांची जीवनशैलीच सुधारली नाही तर खेड्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याची स्थितीही सुधारली आहे. याशिवाय या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे, कारण जास्तीत जास्त लोक एलपीजी सिलिंडर चा वापर करू लागले आहेत.

निष्कर्ष

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे, जी केवळ स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देत नाही तर महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्य सुधारण्यातही मदत करते. ही योजना भारताच्या विकास आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्याला पुढे नेण्याची गरज आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारतातील ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे शक्य होत आहे. (CM Annapurna Yojana Labharthi 2024)

2 thoughts on “अन्नपूर्णा योजना कोणाला मिळणार लाभ ? पहा कुणाला किती मिळणार पैसे : CM Annapurna Yojana Labharthi 2024”

Leave a comment