solar pump : 10 टक्के रक्कम भरा आणि मिळवा सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स आणि कृषी पंप; महावितरणाकडून माहिती

solar pump शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून, फक्त 10 टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स आणि कृषी पंप, असा संपूर्ण संच देण्यात येणार आहे. तर ‘महावितरण’ ने 6 महिन्यात राज्यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पंप बसविण्यामध्ये 50 हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधेसाठी जोरदार काम सुरू असल्याची माहिती ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिले आहे.

solar pump

सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना किती भरावी लागणार आहे रक्कम.

महावितरण चे अध्यक्ष लोकेश चंद्र असे म्हणाले की, सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के रक्कम भरून मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत संपूर्ण संच देण्यात येणार आहे. solar pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे आणि तसेच,वीज बिलाची चिंता राहणार नाही. असे या योजनेचा उद्देश आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरणार आहे.तसेच, अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 5 रक्कम मागेल त्याला सौर कृषी पंप साठी भरावी लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून दिली जाते.

solar pump राज्यात या योजनेअंतर्गत किती पंप बसवण्यात आले

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कुसुम-बी या योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत महावितरण कडे फेब्रुवारी महिन्यात 2 लाख70 हजारअर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 164 लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम भरलेली असून, यापैकी 50 हजार 410 अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंप बसविण्यात आले आहे अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

हे वाचा : मागेल त्याला सौर पंप अर्ज असा करा


महावितरण चे अध्यक्ष लोकेशन चंद्र हे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लवकरात लवकर पंप बसविण्यात येतील. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याची उद्दिष्टे ठेवले आहे. त्यामुळे या योजनेचे काम खूप वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 ते साडेसात पाहिजे तेवढा कृषी पंप मंजूर होतात.

सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून किती वर्ष वीज निर्मिती होत असते

सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून 25 वर्षासाठी वीज निर्मिती होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा आपल्या शेतामध्ये एकदा संच बसविला की 25 वर्ष स्वतःचे हक्काचे व स्वातंत्र्याचे सिंचनाचे साधन उपलब्ध होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जसे की पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस लाईट असायची त्यावेळेस शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असायचे मग दिवसा किंवा रात्री जावे लागत होते.

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

परंतु आता या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाच वीज पुरवठा होत असल्यामुळे रात्री शेतात जाण्याची गरज पडणार नाही आणि तसेही वीज बिलापासून या शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

Leave a comment