ration card new update. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश निर्गमित केला आहे या आदेशामध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे रेशन कार्डधारकांना व रेशन कार्ड मध्ये नावे असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या आधार कार्ड सोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट असणारी व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात यावे किंवा तशा रेशन कार्ड दुकानदारांना सूचना देण्यात याव्यात.
मयत व्यक्तीचे नाव रेशनकार्ड मधून वगळण्यात यावे.
शासनाने निर्गमित केलेला नवीन आदेशानुसार. जर रेशन कार्ड मध्ये मयत व्यक्तीचे नाव असेल आणि ते नाव अद्याप पर्यंत कमी केले नसेल, तर ते नाव कमी करण्यासाठी तात्काळ रेशन कार्ड वाटप कार्यालया सोबत संपर्क साधावा. मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला, आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडून अर्ज सादर करावा. हे कागदपत्र जोडून दिल्यानंतर स्वस्त धान्य दुकान कार्यालयाकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. व मयत व्यक्तीचे नाव आपल्या रेशन कार्ड मधून वगळण्यात येईल.
ration card new update सर्व सदस्यांची kyc करणे आवश्यक.
रेशन कार्ड अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व कुटुंबातील सदस्यांची kyc करणे बंधनकारक आहे. ही kyc करण्यासाठी आपल्याजवळील रेशन कार्ड दुकानांमध्ये जाऊन आपण आपली केवायसी पूर्ण करू शकता. केवायसी करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याचे बायोमेट्रिक घेणे आवश्यक आहे. बायोमेट्रिकच्या सहाय्याने ही केवायसी पूर्ण केली जाणार आहे. जे सदस्य केवायसी करणार नाहीत त्या सदस्यांचे नाव रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत ज्या रेशन कार्ड धारकांनी किंवा त्यांच्या सदस्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी तात्काळ केवायसी करून घ्यावी.
हे वाचा: आता 100 रुपयांचा बॉन्ड बंद.
Kyc अंतिम तारीख
रेशन कार्ड धारक व रेशन कार्ड मधील सदस्य यांची केवायसी करण्यासाठी शासनाने 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीमध्ये केवायसी पूर्ण न केल्यास रेशन कार्ड मधून ज्या सदस्यांची केवायसी पूर्ण होणार नाही त्या सदस्यांची नावे व गळण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या 31 ऑक्टोबरच्या आत ज्या सदस्यांची केवायसी करणे बाकी आहे त्यांनी आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून आपला लाभ आपल्याला मिळत राहील.
1 thought on “रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती. ration card new update.”