महिलांना मिळणार  सरकारकडून 3 लाख रुपयांचे कर्ज, पहा सविस्तर माहिती: mahila udyogini yojana

mahila udyogini yojana केंद्र सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत . महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे उद्योगिनी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे, जेणेकरून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक महत्वकांशा अशी योजना ठरणार आहे.

उद्योगिनी योजनेची वैशिष्ट्ये

mahila udyogini yojana उद्योगिनी योजना ही केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योगिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

हे वाचा: बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
farmer crop loan farmer crop loan शेतकरी ओळखपत्र धारकांना मिळणार कर्ज!

mahila udyogini yojana योजनेचे उद्दिष्टे

  • या योजनेच्या अशे उद्देश आहे की, महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे
  • महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी तीन लाख रुपये कर्ज दिल्यामुळे महिलांचे जीवनमान सुधारेल.

उद्योगिनी योजनेचे आर्थिक फायदे

  • महिलांना 3 लाख रूपया पर्यंतचे कर्ज
  • बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध
  • सुलभ परतफेडीची व्यवस्था
  • कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही

उद्योगिनी योजनेचे फायदे

  • या योजनेअंतर्गत महिलांचे सामाजिक स्थान उंचावणे
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • या योजनेच्या आधारे महिलांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण होईल.
  • या योजनेच्या आधारे एक रोजगार निर्मिती वाढविण्यास मदत होईल.

उद्योगिनी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला.
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

ज्या महिलाना व्यवसाय  इच्छुक आहेत अशा महिलांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. त्यासाठी अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेकडून त्या अर्जाची छाननी केली जाईल. अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र असणाऱ्या महिलांना कर्ज मंजूर केले जाते.

उद्योगिनी योजनेची सद्यस्थिती आणि आव्हाने

उद्योगिनी योजना ही सध्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. अजून ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सुरू झालेली नाही. पण मात्र, लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू होणार असून महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.


उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना अधिक कर्ज दिले जाणार आहे या कर्जाच्या माध्यमातून इच्छुक असणाऱ्या महिलाना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे केंद्र सरकारचा ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आणणे आहे. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे. त्यामुळे सर्व महिलांनी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.

हे पण वाचा:
women loan scheme women loan scheme: व्यवसायासाठी महिलांना 3 लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज…







हे पण वाचा:
cmegp loan cmegp loan: तरुणांना मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज: असा मिळवा लाभ.



Leave a comment