तुमच्या गावची नवीन मतदान यादी अशी काढा Voter List 2024.

Voter List 2024 : जर तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी काढायची असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून सहज आणि काही मिनिटातच काढता येऊ शकते. आता तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या घरी बसल्यास स्वतःच्या मोबाईल मध्ये मतदान यादी काढू शकता. आज आपण या लेखांमध्ये मतदान यादी कशी काढायची याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Voter List 2024 मतदान यादीत नाव कसे नोंदवायचे ?

Voter List 2024 वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपण नाव नोंदणी करू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्यासाठी या https://voters.eci.gov.in/ नवीन वेबसाईट वरती अर्ज करता येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही मिनिटातच नवीन मतदार नोंदणी करू शकतात.
किंवा तुम्हाला तुमच्या जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्राला भेट देऊन पण मतदार यादीत आपले नाव नोंदणी करता येऊ शकेल.

हे वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: साठी पेमेंट करावे का? पहा सविस्तर माहिती .

Voter List 2024 मतदार यादीत नाव शोधणे

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात, मतदार यादीत नाव शोधणे खूप सोपे झाले आहे., मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ” Check my name in voter list 2024 ” सर्वप्रथम अलीकडे नवीन मतदार यादी असणे आवश्यक आहे. नवीन मतदार यादी अलीकडे असेल तर आपण लगेच आपले नाव यादी चेक करू शकता. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. नवीन मतदार यादी कशी काढायची याबद्दल खालील प्रमाणे माहिती पाहूया.

Voter List 2024

Voter List 2024 अशी पहा गावची मतदान यादी

  • मतदान यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या https://voters.eci.gov.in/login अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करावी लागेल .
  • ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
  • जिल्हा निवडल्यानंतर विधानसभा निवडून घ्यावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला यादी कोणत्या भाषेमध्ये हवी आहे ती भाषा निवडून घ्यावी लागेल.
  • भाषा निवडल्यानंतर भाग क्रमांक (आपले गाव/वस्ती) सिलेक्ट करून घ्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एका चौकोनातील Captcha कोड टाकावा लागेल आणि Open PDF यावरती क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर तुमच्या गावची यादी ओपन होईल. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी पाहू शकता.Voter List 2024

Leave a comment