Birsa Munda Krushi Kranti Yojana: शेतकऱ्यांसाठी ठरते फायदेशीर ! तर पहा किती आणि कसे मिळते अनुदान?

Birsa Munda Krushi Kranti Yojana : राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी ( Farmers) विविध योजना राबवत असते आणि या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. तसेच इतर जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमांकाने योजना चा लाभ मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आलेले आहे. सरकारचा असा उद्देश आहे की , शेतकऱ्यांचे जीवनमान आर्थिक स्तरावर उंचावणे, कोणीही लाभ धारक अनुदानापासून वंचित राहू नये. यामुळे वेगवेगळ्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ( Farmers) आर्थिक मदत व्हावी यासाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बिरासा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana)राबवण्यात आलेली आहे. ही योजना अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. तर आज आपण या लेखांमध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत किती आणि कसे अनुदान मिळते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana या योजनेअंतर्गत लाभ मिळणारे जिल्हे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती (Birsa Munda Krushi Kranti Yojana ) योजनेअंतर्गत ठाणे, पालघर, रायगड ,नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे ,अहिल्यानगर,नांदेड,अमरावती,यवतमाळ,नागपूर,गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या 16 जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळून शकणार आहे. या योजनेतून कशा कशासाठी लाभ दिला जाऊ शकतो याबद्दल खालील प्रमाणे माहिती पाहूया.

हे वाचा : सोलार योजनेसाठी शेतकऱ्यांनी पेमेंट केले तर सोलर मिळतो का? पहा सविस्तर.

Birsa Munda Krushi Kranti Yojana या योजनेत समाविष्ट कामे.

  • नवीन विहीर खोदणे
  • जुनी विहीर दुरुस्त करणे
  • इनवेल बोरिंग घेणे
  • वीज जोडणी
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण
  • सूक्ष्म सिंचन संच
  • पंपसंच
  • पाईप्स
  • परसबाग तयार करणे
  • घराभोवती भाजीपाला पिके घेणे

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे .तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

कागदपत्रे तयार ठेवा.

  1. केवायसी (KYC)
  2. जात प्रमाणपत्र
  3. सातबारा आणि आठ उतारा
  4. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  5. ग्रामसभेची शिफारस

Birsa Munda Krushi Kranti Yojana पात्रता अटी

  1. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक आहे.
  2. शेतकऱ्यांकडे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  3. नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास 0.40 हेक्टर क्षेत्र आवश्यकआहे .
  4. इतर बाबींसाठी 0.20 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे.
  5. शेतकऱ्याचा सातबारा आणि आठ उतारा आवश्यक.
  6. स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यकआहे .
  7. वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. (तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक)
  8. ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

Birsa Munda Krushi Kranti Yojana अनुदानाचे तपशील.

  • नवीन विहीर खोदणे यासाठी 2 लाख 50 हजार अनुदान
  • जुनी विहीर दुरुस्ती करणे यासाठी 50 हजार अनुदान
  • इनवेल बोअरिंग 20 हजार रुपये अनुदान
  • वीज जोडणी 10 हजार रुपये अनुदान.
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख रुपये अनुदान.
  • परसबाग 500 रुपये
  • सूक्ष्म सिंचन संच यासाठी 50 हजार रुपये अनुदान.
  • पंपसंच यासाठी 20 हजार रुपये अनुदान
  • पाईप्स यासाठी 30 हजार रुपये अनुदान.
  • नवीन वीर पॅकेज 3.35 ते 3.30 लाख रुपये अनुदान.
  • जुनी विहीर पॅकेज 1.35 ते 1.60 लाख रुपये अनुदान.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

महत्त्वाची सूचना.

अनेकदा योजना उपलब्ध असूनही, आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शेतकरी वंचित राहतात. त्यामुळे अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, किंवा पंचायत समितीकडे संपर्क साधावा. योग्य माहिती मिळवून योजनेचा लाभ घ्यावा. Birsa Munda Krushi Kranti Yojana


1 thought on “Birsa Munda Krushi Kranti Yojana: शेतकऱ्यांसाठी ठरते फायदेशीर ! तर पहा किती आणि कसे मिळते अनुदान?”

Leave a comment