e pik pahani last date रब्बी ई पीक पाहणी करण्यासाठी 15 जानेवारी अंतिम तारीख.

e pik pahani last date महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेला उपक्रम आणि केंद्र शासनाने त्याची दखल घेऊन संपूर्ण देशभरात लागू केलेली ई पिक पाहणी मोहीम अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा हा उपक्रम हाती घेतला.

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा या उपक्रमाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येते. आता ही नोंद करण्याची प्रक्रिया खरीप, रब्बी आणि संपूर्ण वर्ष या तीन हंगामाच्या माध्यमातून पार पाडली जाते.

ई पिक पाहणी महत्त्व

e pik pahani last date शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करणे शासनाने बंधनकारक केले आहे. यातच राज्य शासनासोबतच केंद्र शासनाने देखील ही (DCS) मोहीम हाती घेऊन, देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करण्याकरिता बंधनकारक केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ई-पीक पाहणी 2025 ई-पीक पाहणी 2025: खरीप हंगामासाठी नवीन ॲपद्वारे पीक नोंदणी सुरू

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर ऑनलाईन पद्धतीने केली असेल तर त्या शेतकऱ्याने पीक घेतले आहे असे समजले जाते. त्या शेतकऱ्याला पुढील नैसर्गिक आपत्ती नुसार होणारे नुकसान असेल किंवा शासकीय योजनेनुसार मिळणाऱ्या अनुदान असेल. पीक विमा लाभ असेल या सर्व घटकांचा लाभ देण्यासाठी ही ई पीक पाहणी नोंद अत्यंत महत्वाची आहे. त्यासोबतच शासकीय हमीभावाने शेतमालाची विक्री करण्याकरिता देखील आपल्या सातबारेवर आपल्या पिकाची नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

e pik pahani last date जर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ऑनलाइन पद्धतीने केली नाही तर त्या शेतकऱ्याची जमीन पडीक आहे असे गृहीत धरले जाते. पडीक जमीन गृहीत धरल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान पीक विमा अश्या सर्व योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. उदा. खरीप हंगाम 2024 मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यात आले होते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी द्वारे नोंद केली नाही त्या शेतकऱ्यांना या लाभा पासून वंचित ठेवण्यात आले होते.

हे पण वाचा:
Land Possession update Land Possession update: आता अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर ताबा असणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि अटी

रब्बी ई पिक पाहणी अंतिम तारीख e pik pahani last date

रब्बी हंगाम 2024- 2025 करिता ई पिक पाहणी नोंद 01 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालेले आहे. रब्बी हंगामातील ई पिक पाहणी नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपल्या पिकाची नोंद ई पिक पाहणी द्वारे केली नसेल त्यांनी येत्या 15 जानेवारी 2025 च्या अगोदर आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी स्तरावरून रब्बी 2024 हंगामातील ई पीक पाहणी करता येणार नाही.

रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी सुरू अशी करा ई पीक पाहणी

ई पिक पाहणी कशी करावी.

ई पिक पाहणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये E-Peek Pahani ई-पीक पाहणी(DCS) हे एप्लीकेशन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपल्या शेतात जाऊन आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करू शकता. ई पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सविस्तर समजून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहावा. जेणेकरून आपल्याला ई पिक पाहणी कशी करावी यासंदर्भात सर्व माहिती मिळेल.

हे पण वाचा:
e pik pahani Update e pik pahani Update: खरीप हंगामाची ई-पीक पाहणी झाली सुरू, ई-पीक पाहणी या संदर्भात मोठे अपडेट..! जाणून घ्या सविस्तर

ई पिक पाहणी करताना काही अडचण निर्माण झाल्यास

e pik pahani last date बऱ्याच शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये ॲप व्यवस्थित न चालणे, शेतात असून सुद्धा शेताचा अंतर जास्त असल्याचा मेसेज प्रदर्शित होणे, सर्व माहिती भरून देखील काहीतरी चुकीची माहिती असल्याचा मेसेज येणे, क्षेत्र शिल्लक न दाखवणे. या व अशा विविध अडचणीसाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना समस्या येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना या संदर्भात अडचणी निर्माण होत आहे. त्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाची संपर्क साधून आपली अडचण त्यांना अर्जाद्वारे लेखी स्वरूपात द्यावी जेणे करून तलाठी स्तरावरून आपल्या अडचणीचे सोल्युशन आपल्याला दिले जाईल. आपण आपल्या ई पीक पाहणी तक्रार अर्ज सादर केल्या नंतर आपली ई पीक पाहणी तलाठी स्तरावरून देखील पूर्ण केली जाऊ शकते. e pik pahani last date

हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

Leave a comment