Maharashtra Bajarbhav कापूस ,सोयाबीनच्या दरात वाढ, तर काय आहे लिंबाचे दर… पहा पुढील हप्त्यात कसा राहणार बाजार भाव?

Maharashtra Bajarbhav : सध्या शेतातील मालाच्या भावात कधी चढत कधी उतरला मिळत आहे. बाजरी, लिंबू, कलिंगड,सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांचे दर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहेत. बाजरीची उत्पन्न यावर्षी चांगले झाल्याने पुरवठा सुरळीत आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उन्हाळी बाजरीचा पेरा गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी झाला आहे. परंतु बाजारातील आवक थोडीशी कमी झाल्यामुळे बाजरीचा भाव टिकून आहे. सध्या बाजारामध्ये बाजरीला 2,600 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल (Maharashtra Bajarbhav) भाव मिळत आहे. काही दिवसांमध्ये बाजरीची ओळख कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार भाव काहीसे चढ-उतार होऊ शकतात ,असा अंदाज बाजार अभ्यासकांनी दिला आहे.

लिंबाच्या दरात सुधारणा

उन्हाळा आला की,लिंबाची मागणी उष्णतेमुळे वाढत असते, तसेच याही वर्षी उष्णतेमुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे . लिंबाची बाजारातील आवक कमी झाल्यामुळे मागील दोन आठवड्यापासून लिंबाच्या दरात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे .

सध्या बाजारामध्ये लिंबू 7,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे .पुढील काही आठवड्यामध्ये बाजारातील लिंबाची आवक आणखीन घटू शकते, त्यामुळे लिंबाचे भाव वाढू शकतील,असा अंदाज व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. Maharashtra Bajarbhav

हे वाचा : हरभऱ्याच्या दरात सुधारणा: जंबू हरभऱ्याला मिळतो सर्वाधिक दर..

टरबुजाच्या दरात वाढ

उन्हामुळे कलिंगडाची मागणी वाढत आहे.परंतु अनेक भागांमध्ये कलिंगडाची काढणी संपली आहे . त्यामुळे बाजारातील कलिंगडाची आवक कमी झाली आहे . यामुळे मागच्या दोन आठवड्यामध्ये कलिंगडाच्या दरात वाढ झाली आहे .प्रति क्विंटल मागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे .Maharashtra Bajarbhav

सध्या बाजारामध्ये कलिंगडाला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे .पुढील त्यामध्ये बाजारातील कलिंगडाची आवक आणखीन कमी होण्याची शक्यता आहे .त्यामुळे कलिंगडाचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहे .

सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा

सोयाबीनचे दर पाहायच झाल तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरात सरासरी 50 रुपयांची वाढ केली आहे त्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. सध्या सोयाबीनला 4,500 ते 4,750 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. बाजार समित्यांमध्येही सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे 50 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे . त्यामुळे आज सोयाबीनला (Maharashtra Bajarbhav) 4,100 ते 4,400 रुपये भावाने विकले गेले आहे .

बाजारांमधील सोयाबीनचे आवक कमी होत असून मागणी स्थिर आहे ,त्यामुळे पुढील काही दिवस आणखीन सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार चालूच राहतील,असे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे

कापसाचे दर वाढले

सध्या मार्च महिना संपल्यानंतर बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे . कालच्या बाजारामध्ये एकूण 52,000 गाठींची (प्रत्येकी 170 किलो) आवक झाली .पण मात्र दुसरीकडे कापसाची मागणी असल्याने भावामध्ये सुधारणा दिसून आली आहे .

आज सध्या कापसाला 7,100 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. पुढील हप्त्यामध्ये कापसाचे आवक आणखीन घटनेची शक्यता आहे .त्यामुळे बाजारात कापसाचे दर आणखीन वाढवून शकतात,असे कापूस (Maharashtra Bajarbhav) बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात तापमानामध्ये वाढ होत आहे . त्यामुळे उन्हाळ्यातील फळे आणि भाज्यांच्या दरात चांगली वाढ दिसून येत आहे .मात्र काही शेतीमालाच्या बाजारपेठेत पुरवठा आणि मागणी यामध्ये होणाऱ्या बदल या मुळे दरात चढउतार सुरूच राहतील. शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजार भावांचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना चांगला दर मिळून अधिक नफा मिळू शकतो. Maharashtra Bajarbhav

1 thought on “Maharashtra Bajarbhav कापूस ,सोयाबीनच्या दरात वाढ, तर काय आहे लिंबाचे दर… पहा पुढील हप्त्यात कसा राहणार बाजार भाव?”

Leave a comment

Close Visit Batmya360