Gold price down: मागील अनेक दिवसांपासून कोणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मागील एक वर्षांमध्ये सोन्याच्या दारामध्ये साडेचार हजार रुपये पर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या या दराने सोन्याच्या उच्चंकी दराला गाठले. सोन्याचे दर 91 हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात पोहोचले. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. ज्यामुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच गेले. परंतु आता सोन्याच्या दाराबाबत एक खळबळ जनक बातमी समोर आलेली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होणार असल्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. सोन्याच्या तारामध्ये तब्बल 35 ते 40% पर्यंत घसरण होण्याचा अंदाज तज्ञाकडून वर्तवला जात आहे. अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस ऑफ मॉर्निंग स्टर चे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या रिपोर्टनुसार सोन्याचे दर पुढील काही काळामध्ये 38 टक्क्यांनी घसरणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
सोने येणार 55000 रुपये वर Gold price down
Gold price down अमेरिकन अर्थतज्ञ यांनी केलेल्या या दाव्यानुसार सोन्याचे दर पुढील काही काळामध्ये 35 ते 40 टक्क्याने खाली येतील. त्यांचा दावा जर खरा ठरला तर भारतामध्ये सोन्याचा भाव 55 हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात पाहायला मिळेल. आजच्या तुलनेमध्ये सोन्याचे दर हे 36 ते 37 हजार रुपयांनी खाली आल्याचे पाहायला मिळेल.
सध्या अनेक तज्ञाकडून सोन्याच्या भावाबाबत भाष्य केले जात आहे. यामध्ये अनेक तज्ञाकडून सोन्याचे भाव खाली येणार अशी माहिती दिली जात आहे. तर काही तज्ञ सोन्याचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली येणार नाहीत असे देखील माहिती देत आहे. बाजारात आजही सोन्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळे सोन्याचे दर एकदमच एवढे कमी होणार नाहीत. असा अंदाज काही तज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. बाजारात पुरवठा वाढला तरच सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळेल. परंतु सोन्याच्या दारामध्ये थेट 35 ते 40 टक्के घसरण होईल असे वाटत नाही. असे देखील काही तज्ञांचे मत आहे.