farmer news: शेतकऱ्याची चक्क भारताच्या कृषीमंत्र्याकडे हेलिकॉप्टरची मागणी.!! 10 कोटी कर्ज मागितले.

farmer news: शेती करायचं म्हटलं की सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेत रस्ता. शेतीसाठी जर रस्ता उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेती रस्त्या संबंधी अनेक कायदे शासनाने तयार जरी केली असती तरीसुद्धा त्या कायद्यानुसार अनेक शेतकऱ्यांना शेत रस्ता प्राप्त होत नाही. याच अडचणीला कंटाळून बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषिमंत्र्यालाच दहा कोटी रुपये कर्ज देण्याची मागणी केली आहे. या मागणीमध्ये हेलिकॉप्टर घेण्यासाठी हे कर्ज हवे असल्याची मागणी केली आहे.

farmer news

महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रार देऊन देखील महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांनाच हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्ज मंजूर करावे अशी मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील बंगालीपिंपळा तालुका गेवराई येथील राजेंद्र नवले या अल्पभूधारक शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांनाच हेलिकॉप्टर साठी कर्ज मागणी अर्ज केला आहे.

राजेंद्र नवले या अल्पभूधारक शेतकऱ्याला गट क्रमांक 1341 मध्ये एक हेक्टर 64 एवढी जमीन आहे. ही जमीन कसण्यासाठी आणि जमिनीतून उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याला जाण्यासाठीच रस्ता नसल्याची तक्रार शेतकऱ्याने वारंवार महसूल विभागाला तोंडी स्वरूपात तसेच लेखी स्वरूपात देखील सादर केली होती. शेतात बैलगाडी ट्रॅक्टर शेती अवजारे बी बियाणे खते तसेच शेतमजूर ने आण करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकरी कंटाळला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

farmer news 16 जानेवारी 2025 रोजी लेखी स्वरुपात शेत रस्ता मिळण्याबाबत महसूल प्रशासनाकडे अर्ज देखील सादर केला होता. परंतु आतापर्यंत महसूल विभागाकडून याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर शेतकरी राजेंद्र नवले यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना पत्र पाठवून या पत्रामध्ये हेलिकॉप्टर साठी कर्ज देण्याबाबत मागणी केली आहेत.

काय म्हणले आहे पत्रात farmer news

farmer news शेतकरी राजेंद्र नवले यांनी कृषिमंत्र्यांना पाठवलेल्य पत्रामध्ये नमूद केले आहे की मी एक गरीब शेतकरी आहे. रोज मजुरी किंवा कष्ट केले तरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शेती करता यावी याकरिता रस्ते विहीर सिंचन गोदाम कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्यामुळे मुलांचे शिक्षण आरोग्य या सर्व आर्थिक परिस्थितीने मी हतबल झालेलो आहे. मला शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मला हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता आहे.

मी माझ्या शेतामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शेतात ये जा करून माझी शेती अस शकतो. तरी माननीय मंत्री महोदयांनी कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत मला दहा कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी करणारे पत्र शेतकरी नवले यांनी पाठवले आहे. केंद्रीय कृषिमंत्री सबतच नवले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या पत्राची एक एक प्रत पाठवली असल्याची माहिती शेतकरी नवले यांनी दिली आहे.

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

Leave a comment