PM Awas Yojana Rules 2025 :घराचे स्वप्न पूर्ण होणार! पंतप्रधान आवास योजनेतील 3 अटी रद्द; या 10 निकषांवर मिळणार घर व 1.20 लाखांची मदत

PM Awas Yojana Rules 2025 : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत सध्या देशभरात घरकुल लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे .सरकार या योजनेचा लाभ गरीब कुटुंबांतील नागरिकांना व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे व आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरकारने पात्रतेच्या अटीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे .

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला एकूण 13 निकषाची पूर्तता आवश्यक होती ,मात्र आतासरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे आता फक्त 10 अटी मर्यादित करण्यात आले आहे .यामुळे जे नागरिक अपात्र ठरत होते, त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे .विशेष म्हणजे: उत्पन्नाची मर्यादा वाढवून आता 15,000 रुपये करण्यात आली आहे यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे .

PM Awas Yojana Rules 2025

यापूर्वीची उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपये होती तसेच विविध निकषांची पूर्तता करावी लागत होती .यापूर्वी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या नागरिकांना 1.20 लाख रुपये तर डोंगराळ भागासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना 1.30 लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल अनुदान म्हणून दिले जात होते .PM Awas Yojana Rules 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Pradhan Mantri Awas Yojana Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल संदर्भात मोठी खुशखबर! नवीन घरकुल सर्वेची मुदतवाढ

हे वाचा : घरकुल योजना अर्ज प्रक्रिया पात्रता आणि कागदपत्रे.

PM Awas Yojana Rules 2025

2025 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार आता काही अटी रद्द करण्यात आले आहे. यामध्ये उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यापूर्वी ज्या कुटुंबाकडे दुचाकी वाहन, स्कूटर किंवा मासेमारीसाठी होडी होती, त्या नागरिकांना अपात्र ठरविण्यात येत होते, परंतु आता हे निकष हटवण्यात आली आहेत.

याशिवाय, ज्या नागरिकांना पूर्वी वेळेअभावी किंवा माहिती नसल्यामुळे सर्वेक्षणात सहभागी होत आले नाही,अशा नागरिकांसाठी आता सरकारने सर्वेक्षणाची अंतिम तारीख वाढवून दिली आहे आता या नागरिकांना 15 मे पर्यंत सर्वेक्षण करता येणार आहे .यामुळे आता जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे .यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना 13 अटी पूर्ण कराव्या लागत होत्या .मात्र आता,सरकारने 3 अटी रद्द केले आहेत चला तर पाहूया कोण कोणत्या आहेत अटी.PM Awas Yojana Rules 2025

हे पण वाचा:
PM Awas Yojana PM Awas Yojana: तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? कसं चेक करणार? जाणून घ्या…

पूर्वी लागू असलेले 13 निकष (ज्या पैकी आता फक्त 10 लागू)

  • कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षाही कमी असावे.
  • घरामध्ये 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नसावा.
  • महिला प्रधान कुटुंब (कोणताही पुरुष सदस्य नसलेले)
  • कुटुंबातील 25 वर्षांवरील सदस्य पूर्णतः अशिक्षित असणे आवश्यक आहे
  • अपंग व्यक्ती असलेले किंवा कोणताही सक्षम प्रौढ नसलेले कुटुंब
  • केवळ मजुरीवर अवलंबून असलेले व जमीन नसलेले कुटुंब
  • 16-59 वयोगटातील कोणताही वयस्क सदस्य नसावा
  • संपूर्ण बेघर किंवा एकच खोली असलेले घर
  • अनुसूचित जाती, जमाती किंवा अल्पसंख्याक समाजातील कुटुंब
  • मासेमारी होडी किंवा दुचाकी असणारे कुटुंब (निकालात)
  • वीज कनेक्शन नाही असे कुटुंब
  • शौचालय नाही असे कुटुंब

कोणते तीन निकष रद्द करण्यात आलेले ?

पंतप्रधान आवास योजना नवीन मार्गदर्शक (PM Awas Yojana Rules 2025) तत्त्वांनुसार खालील तीन अटी विचारत घेतल्या जाणार नाहीत;

  • दुचाकी किंवा मासेमारीसाठी होडी असणे
  • वीज कनेक्शनची अनुपस्थिती
  • घरात गॅस चूल नसणे

नवीन निकष यामुळे काय बदल झाले ?

  • उत्पन्न मर्यादा आता 15,000 रुपये करण्यात आली आहे.
  • वाहन किंवा नाव असणे अपात्रतेचे कारण राहिलेले नाही
  • अधिक गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे
  • आता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य.

हे पण वाचा:
gharkul survey last date gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!

1 thought on “gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!”

Leave a comment