PM Kisan Yojana : पीएम किसान ही योजना केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येत आहे . प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना आता अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी वाटचाल करत आहे. या योजनेअंतर्गत दिला जाणारा आता 20 वा हप्ता जून 2025 मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .मात्र यावेळेस केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पी एम किसान योजनेचा लाभ हा फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.PM Kisan Yojana

काय आहे फार्मर आयडी?
शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. म्हणजे यालाच फार्मर आयडी असे म्हणतात. जो डिजिटल स्वरूपात तयार केला जातो. शासन शेतकऱ्यांची माहिती एका केंद्रीय कृत डेटाबेस मध्ये संकलित करत असून प्रत्यक्ष शेतकऱ्याला एक युनिक आयडी दिला जातो.या फार्मर आयडी मध्ये शेतकऱ्यांचे नाव,आधार क्रमांक,शेतीचे क्षेत्रफळ,पीक पद्धती,बँक खाते आणि इतर माहिती समाविष्ट असते .PM Kisan Yojana
हे वाचा : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात
का केले सरकारने फार्मर आयडी कार्ड बंधनकारक
शासनाने फार्मर आयडी कार्ड बंधनकारक करण्या मागचे कारण म्हणजे, आतापर्यंत पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये अनेक अपात्र व्यक्तींचा समावेश आहे असे उघड झाले आहे. यामध्ये शेत जमीन नसलेले शेतकरी, कर दाते, संस्थात्मक जमीन धारक, सरकारी कर्मचारी या सर्वांचा समावेश होता. या कारणामुळे या योजनेचा लाभ हा पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. मात्र, आता फार्मर आयडी मुळे हा लाभ पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे आणि अपात्र व्यक्ती या योजने पासून आपोआप वगळल्या जातील.
पी एम किसान चा 20 वा हप्ता कधी येणार?
या योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता हा जून 2025 मध्ये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वेळेसारखंच याही वेळेस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट जमात होणार आहेत. मात्र, यावेळेस फक्त फार्मर आयडी लिंक केलेल्या बँक खातांना पैसे दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती पीएम किसान च्या फोटोवर अद्याप करावी, आणि फार्मर आयडी जनरेट केली आहे का याची पुरेपूर खात्री करावी.
दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा 20 वा हप्ता आता फक्त पात्र,फार्मर आयडी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेवर अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे.अन्यथा,आता इथून पुढचा हप्ता बंद होऊ शकतो.PM Kisan Yojana
1 thought on “PM Kisan Yojana :पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्यासाठी नवीन अट! हे महत्त्वाचे डॉक्युमेंट नसेल तर मिळणार नाही 2000 रुपयांचा लाभ..!”