OTS कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! 2 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी हे काम करा? OTS krjmafi yadi

OTS krjmafi yadi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे.

मात्र, या लाभासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत भरावी लागणार आहे.

कर्जमुक्ती योजनेचे तीन टप्पे

या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी पूर्ण झाली. त्याअंतर्गत एकूण २५ लाख ८१ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत सुमारे १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जमा झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आता दुसऱ्या टप्प्यातील ओटीएस घटकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. संबंधित याद्या बँका तसेच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध असतील.

शेतकऱ्यांनी काय करावे?

  • ओटीएसनुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी.
  • एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  • देय रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. ज्यांनी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी केली आहे, त्यांनाच आधार प्रमाणीकरणाची सुविधा मिळणार आहे.
  • आधार प्रमाणीकरण आणि इतर पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर खात्यावर दोन लाख रुपयांचा लाभ हस्तांतरित केला जाईल.

विभागनिहाय लाभार्थी संख्या

  • नाशिक – ४८,३७९
  • पुणे – ४०,९४६
  • छ. संभाजीनगर – ३९,५९७
  • अमरावती – २५,९१७
  • नागपूर – १२,००२
  • कोकण – २,९७९
  • एकूण – १,६९,८२०

ओटीएस म्हणजे काय?

एकवेळ समझोता (OTS – One Time Settlement) म्हणजे थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक आणि कर्जदार शेतकरी यांच्यात ठरावीक रकमेवर केलेला एकदाच कर्जफेडीचा समझोता. सोप्या भाषेत, एखाद्या शेतकऱ्याने बँकेकडून ३ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले आणि ते थकीत झाले, तर योजनेच्या नियमानुसार बँकेला देय असलेल्या ठरावीक रकमेचा काही हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागतो आणि उर्वरित पात्र रक्कम शासनाकडून दिली जाते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके करणे हे आमचे प्राधान्य आहे. कर्जमुक्ती योजना टप्प्याटप्याने राबवली जात आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावरील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा.”