Chara lagvad anudan : दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे राज्यात चारा टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत गायरान तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध चारा पिकांची लागवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत बियाणे, रोपे, मजुरी आणि सामग्रीसाठी हेक्टरी आर्थिक तरतूद निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगारही मिळणार आहे.

कोणत्या चारा पिकासाठी किती अनुदान?
| चारा पीक | अनुदान (प्रति हेक्टर) | मनुष्यदिवस |
|---|---|---|
| मका | ४७,३०७ रुपये | ९५ |
| ज्वारी | ४२,७७८ रुपये | ८८ |
| बाजरी | ३५,५०५ रुपये | ७४ |
| नेपिअर गवत | ७६,०३१ रुपये | १५५ |
| मेथी घास (ल्युसर्न) | १,१३,२९० रुपये | २७० |
| ज्वारी मल्टीकट | ५२,०३६ रुपये | १०० |
| बाजरी मल्टीकट | ७६,०४५ रुपये | १८० |
मेथी घास अर्थात ल्युसर्नसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. नेपिअर गवत आणि मल्टीकट बाजरीसाठीही चांगले अनुदान उपलब्ध आहे.

बियाणे कुठून मिळेल?
लाभार्थ्यांना महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, एनएफएल, भारतीय कृषी संशोधन परिषद किंवा कृषी विज्ञान केंद्र यांसारख्या अधिकृत संस्थांकडून दर्जेदार बियाणे उपलब्ध करून घेता येईल.
महत्त्वाच्या अटी
- रोजगार हमी योजनेंतर्गत ही कामे राबविण्यात येणार असल्याने यंत्रसामग्रीऐवजी स्थानिक मजुरांना प्राधान्य द्यावे लागेल.
- कमी पाण्यात आणि कमी कालावधीत अधिक चारा देणाऱ्या वाणांची निवड केल्यास चांगला फायदा होईल.
- स्वतःची जमीन, पाण्याची सोय आणि रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
लाभ कसा घ्याल?
इच्छुक शेतकरी आणि पशुपालकांनी नजीकच्या ग्रामपंचायत, तालुका कृषी कार्यालय, तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासोबतच ग्रामीण रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. आपणही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच पावले उचला.



