विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप योजना 2024

मोफत सायकल वाटप योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सरकारच्या नवनवीन योजनेची या राज्यामध्ये सुरुवात आहे. जास्तीत जास्त योजना त्या मुलींसाठी आहे .तसेच आपण आज एक नवीन  योजना पाहणार आहोत . या योजनेचे नाव आहे मोफत सायकल योजना. ही योजना ग्रामीण भागातील मुलींसाठी सरकारने अमलात आणलेले आहे. ग्रामीण भागामध्ये  अनेक गावांमध्ये आजही शाळेची सुविधा उपलब्ध नाही. जिल्हा परिषद शाळा या बऱ्याचशा गावामध्ये चौथीपर्यंतच असतात. चौथीपासून पुढचे शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच मुला मुलींना दुसऱ्या गावी जाऊन घ्यावे लागतील. त्या कारणामुळे अनेक जण आपल्या मुलींना शिकवत नाही. मुलींचे शिक्षण बंद करतात. बाहेरगावी जाण्याची सुविधा नसते. व काही कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना सायकल घेऊन देता येत नाही. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते. यामुळे ग्रामीण भागातील शाळेतील मुली या कमी प्रमाणात उपस्थित असतात .

    मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करून घेण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली या योजनेचा लाभ हा मुलींना सायकल घेण्याकरिता पाच हजार रुपये अनुदान दिले आठवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना राज्य शासनाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायकल वाटपाचा आदेश दिला आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता कोण आहे, योजनेचा उद्देश, या योजनेचा लाभ, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आम्ही या लेखा मध्ये दिलेली आहे . हा लेख मी शेवटपर्यंत वाचावा.

मोफत सायकल वाटप योजना

योजनेचे नाव

मोफत सायकल वाटप योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

शिक्षण विभाग  महाराष्ट्र राज्य

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन

लाभ

5000 रुपये आर्थिक मदत

लाभार्थी

ग्रामीण भागातील मुली

योजनेचा उद्देश

गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी  देणे प्रोत्साहन देणे..

मोफत सायकल वाटप योजना उद्दिष्टे

  •  शाळेमध्ये जाण्यासाठी मुलींना सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  •  या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींना शाळेसाठी चालत जाण्याची आवश्यकता नाही.
  •  मोफत सायकल योजना मुळे मुलींचे जीवनमान सुधरेल.
  •  आठवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना या योजनेमुळे प्रोत्साहित होतील.
  •  मुलींना बाहेरगावी शाळेत जाण्यामुळे चालत जाण्याची गरज नाही त्यामुळे त्यांचा वेळेची बचत होईल आणि त्यांना अभ्यास देखील करू शकतील.
  • ज्या मुलींच्या कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असतात अशा कुटुंबातील मुलींना सायकल घेण्यासाठी परिस्थिती नसते पण शिकण्याची खूप इच्छा असते. अशा विद्यार्थिनी साठी या योजनेचा लाभ मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे.
  •  गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांना सायकल खरेदी करण्यासाठी कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासणार नाही

मोफत सायकल वाटप योजना वैशिष्ट्ये

  •  मोफत सायकल योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेली आहे.
  • राज्य शासनाकडून या योजनेसाठी वार्षिक वीस कोटी रुपये एवढे नीधी उपलब्ध करून देण्यात येते .
  •  शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
  •  महाराष्ट्र राज्यातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि आर्थिक विकास होण्यासाठी हि योजना अत्यंत फायद्याची ठरत आहे.

मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

  • लाभार्थी मुलींना सरकारकडून पाच हजार रुपयाची सायकल खरेदीसाठी  आर्थिक मदत केली जाते.
  •  ही रक्कम मुलीच्या किंवा तिच्या पालकाच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत जमा केली जाते
  •  महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना आठवी ते बारावीपर्यंत पर्यंतच्या शिक्षणासाठी कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करता येईल.
  •  या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे आणि अत्यंत सोपी आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये जाऊन फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
  •  गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुलींना सायकल घेण्यासाठी कोणाकडेही पैसे मागण्याची आवश्यकता लागणार नाही या योजनेद्वारे दिली जाते.
  •  मोफत सायकल योजनेचा असा उद्देश आहे की मिळणारी आर्थिक  मदतीतून सायकल खरेदी करून मुलींनी तिचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे. तिला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
मोफत सायकल वाटप योजना

मोफत सायकल वाटप योजना फायदे

  • मोफत सायकल वाटप योजना मुळे मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्या आपले शिक्षण पूर्ण करतील.
  •  या योजनेअंतर्गत मुलींना घरातून शाळेत जाण्यासाठी पायी चालत जाण्याची गरज लागणार नाही.
  •  या योजनेमुळे मुलींच्या वेळेची बचत होईल.
  •  सायकल वाटप योजनेमुळे राज्यातील मुली आत्मनिर्भर बनतील.
  •  या योजनेअंतर्गत मिळणारी जी रक्कम आहे ती मुलींच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने जमा होईल.
  •  मोफत सायकल योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना सायकल विकत घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

मोफत सायकल योजना पात्रता

  •  मोफत सायकल योजनेसाठी विद्यार्थिनी ही महाराष्ट्रा त राज्याची मूळ रहिवासी असावी.
  • लाभार्थी विद्यार्थिनीचे शिक्षण इयत्ता आठवी ते बारावीच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेसाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. या रकमेपासून तुम्हाला सायकल खरेदी करावी लागेल. वरील लागलेली रक्कम ही तुम्हाला तुमच्या स्वतःजवळ भरावी लागेल.
  •  मोफत सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  •  मोफत सायकल योजनेचा लाभ 8 वी ते 12 शिकणाऱ्या मुलींना घेता येईल.
  •  या योजनेसाठी आठवी ते बारावी या चार वर्षांमध्ये एकदा सायकल खरेदीसाठी सरकारकडून मदत दिली जाईल.
  • मोफत सायकल योजनेचा लाभ फक्त मुलींनाच होईल.
  •  सायकल खरेदी केल्यानंतर त्या सायकलच्या देखभालीच्या खर्चासाठी शासनाकडून कुठलीही मदत केली जाणार नाही, त्यासाठी लाभार्थ्यास स्वतःला खर्च करावा लागेल.
  •  या योजनेमध्ये पात्रता असण्यासाठी अर्जदार मुलीचे आई किंवा वडील शासकीय कार्यालयात नोकरी करत असणारा या योजनेच लाभ मिळणार नाही

मोफत सायकल वाटप योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  •  मोबाईल क्रमांक
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  शाळेचा दाखला
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शाळेत शिकत असल्याचा पुरावा
  •  लाभार्थ्यांचा बँक खाते क्रमांक
  • ई-मेल आयडी
  •  सायकल खरेदी पावती

मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत कशी मिळणार आर्थिक मदत

  •  मोफत सायकल योजनेच्या लाभाची रक्कम ही दोन टप्प्याने लाभार्थ्याला मिळेल.
  • सरकारी बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने पहिल्या टप्प्यात लाभार्थी मुलीच्या खात्यामध्ये 3500 रक्कम जमा करण्यात येईल.
  •  लाभार्थी मुलींना सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती सादर केल्यानंतर राहिलेली दुसऱ्या टप्प्यातली जी रक्कम आहे ती म्हणजे 1500 रुपये रक्कम थेट देण्यात येईल.

मोफत सायकल वाटप अर्ज करण्याची पद्धत

  1. मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल.
  2. या योजनेचा अर्ज करण्यासाठी ज्या विद्यार्थ्याला या योजनेची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शाळेत जाऊन शाळेच्या  ऑफिसमधून सायकल वाटप योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. अर्ज संपूर्ण वाचून अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित  भरावी लागेल.
  4. त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज ज्याच्याकडून घेतला आहे त्याच्या जवळ सादर करावा लागेल.

                                         किंवा

  1. अर्जदार विद्यार्थिनीला तिच्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयात जावे लागेल तेथील नियोजन विभागाला भेट द्यावी लागेल.
  2. त्यांच्याकडून सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  4. अर्जासोबत आयुष्य लागणारे कागदपत्रे घेऊन अर्ज सादर कार्यालयात जमा करावा लागेल.                                                                                                    अशा दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही सायकल वाटप योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मोफत सायकल वाटप योजना

निष्कर्ष

    मोफत सायकल वाटप योजना याची सर्व माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा या लेखांमध्ये आवश्यक लागणारी कागदपत्रे, योजनेचा लाभ ,या योजनेमध्ये कोण पात्रता आहे ,या सर्वांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे जर कोणी तुमच्या नातेवाईकांमध्ये ग्रामीण भागात राहत असेल आणि त्यांच्या मुलींना शाळेच्या सुविधा उपलब्ध नाहीये गावांमध्ये अशा मुलींकरता या योजनेची माहिती नक्कीच द्या जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या मुलीसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्धहोईल.

विचारले जाणारे प्रश्न

  1. मोफत सायकल वाटप योजना लाभ कोणाला होणार आहे?
  •  मोफत सायकल वाटप योजना लाभ हा आठवी ते बारावी पर्यंत शिकत असणाऱ्या  मुलींनाच या योजनेचा लाभ होणार आहे.
  1. सायकल वाटप योजनेची अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
  • सायकल वाटप योजनेची अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे. हा अर्ज विद्यार्थ्यांच्या शाळेतून पण केला जाऊ शकतो.
  1. सायकल वाटप योजना अंतर्गत किती रक्कम लाभार्थ्याला मिळेल?
  •  सायकल वाटप योजना अंतर्गत लाभार्थी मुलीला पाच हजार रुपये रक्कम दिली जाईल.
  1. मोफत सायकल वाटप योजना लाभार्थी कोण आहेत?
  •  सायकल वाटप योजनेची लाभार्थ ह्या ग्रामीण भागातील मुली आहेत व घरापासून शाळेपर्यंतचा अंतर पाच किलोमीटर असला पाहिजे. तीच मुलगी या योजनेसाठी लाभार्थी आहे.

2 thoughts on “विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप योजना 2024”

Leave a comment