अंत्योदय अन्न योजना (AAS)

अंत्योदय अन्न योजना (AAS)

अंत्योदय अत्र योजना ही योजना देशातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे कुटुंबासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात भारत सरकारने केलेली आहे जेणेकरून गरीब  आणि आर्थिकदृष्ट्या कुमकुमवत असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ही योजना मणिपूर आणि नागालँड वगळता सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे कार्य करत आहे.

या योजनेची सुरुवात 25 डिसेंबर 2000 रोजी प्रंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी ही योजना सुरू केली होती. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरमहा 35 किलो धन्य दिले जाईल. ते धान्य म्हणजे गहू व तांदूळ आहे. गहू हे प्रति 2 रुपये किलो व तांदूळ हे प्रति 3 रुपये किलो या दरात देण्यात येतील.

 ही योजना भारतीय अत्र  महामंडळ (FCI) मार्फत राबविण्यात येत आहे, या योजनेबाबत लोकांच्या तक्रारी दाखल घेण्यासाठी राज्य सरकारने /केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि जिल्हा स्तरावरील जबाबदार अधिकाऱ्यांना तक्रार निवारण अधिकारी (DGROS) म्हणून नियुक्त केले आहे.

अंत्योदय अन्न योजना

योजनेचे नाव

 अंत्योदय अन्न योजना

योजनेची सुरुवात कोणा द्वारे

योजनेची सुरुवात भारत सरकार द्वारे

लाभार्थी

  देशातील नागरिक

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

श्रेणी

 केंद्र सरकारची योजना

लाभ

 अन्नाची उपलब्धता पुरवणे

अंत्योदय अत्र योजनेचे उद्देश

या योजनेचा  लाभा देशातील सर्व पात्र कुटुंबांना अन्नसुरक्षा प्रदान करणे आहे. अंत्योदय अत्र योजनेचा उद्देश देशातील कोणीही उपाशी राहू नये असा आहे. जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा दारिद्र रेषेखाली कुटुंबांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबांना, या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या मुला बाळांना या योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ व इतर कडधान्य खाण्यास मिळणार आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ गर्भवती महिला आणि स्तनदा मतांसाठी आणि 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पोषण समर्थन यासारख्या अतिरिक्त फायद्याचा समावेश करण्यासाठी तिच्या कव्हरेजचा विस्तार करेल. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 35 किलो धान्य दिले जाणार आहे जेणेकरून त्या कुटुंबांना खूप मोठा हातभार लागेल. असा या योजनेचा उद्देश आहे.

अंत्योदय अन्न योजना नवीन अपडेट

या योजनेच्या नवीन अपडेट अंतर्गत, लाभार्थीची व्यापती 2.5 कोटी कुटुंबावरून 3 कोटी कुटुंबापर्यंत वाढवली जाईल. त्यानंतर याशिवाय, प्रत्येक कुटुंबाला आता दरमहा 35 किलो धान्य दिले जाईल, या अगोदर पूर्वी 25 किलो धान्य दिले जात होते. यामुळे योजनेअंतर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या एकूण अन्नधान्याचे प्रमाण 62.5लाख टनावरून आत्ता दरमहा 87.5 लाख टनापर्यंत वाढेल.

प्रत्येक कुटुंबाला या योजनेअंतर्गत 10 किलो अन्नधान्य प्रति 2 रुपये किलो या दराने दिले जाईल. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना, देशातील सुमारे 15 कोटी लोकांना याचा फायदा होत आहे. अन्नधान्याची वाढवलेली मागणी पूर्तता करण्यासाठी सरकारने AAY साठी वाटप ₹ 4,000 कोटींनी वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अंत्योदय अन्न योजनेची वैशिष्ट्ये

  •  अन्न अनुदान: या योजनेअंतर्गत अन्नधान्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते, गव्हासाठी किंमत प्रति 2 रुपये किलो, व प्रति किलो किंमत तांदूळ 3 रुपये आणि इतर गरजा आहे. याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो धान्य मिळते.
  •  भूक कमी करणे: या योजनेअंतर्गत  कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला, आणि ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे अशा कुटुंबांना अन्नधान्य देऊन त्यांची गरज भागवली जाते हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  •  अत्र वितरण: अंत्योदय  अत्र योजनेअंतर्गत, रेशन कार्ड आणि प्रत्येक बीपीएल कुटुंब असलेल्या कोणत्याही मर्यादी शिवाय अन्नधान्य मिळविण्यास पात्र आहे. या योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 8.51 लाख टन अन्नधान्य पुरवठा केला जातो.

अंत्योदय अन्न योजनेचे फायदे

  • अंत्योदय अत्र योजना, अंतर्गत भारत सरकारने देशातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या
  •  कुटुंबाला या योजनेअंतर्गत मूलभूत अत्र गरजा अतिशय स्वस्त दरात पूर्ण करण्यात मदत झाली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील व्यक्तींना या योजनेमुळे खूप मोठा आधार मिळालेला आहे. असा या योजनेचा उद्देश होता.
  •  AAY कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो अन्न मिळविण्यास पात्र आहे.

अंत्योदय अन्न योजना पात्रता आणि निकष

  • या योजनेमध्ये ज्या कुटुंबाचे प्रमुख विधवा स्त्री , किंवा ज्यांना सामाजिक आधार नाही अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  • या योजनेमध्ये पात्र असण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 150,000/-पेक्षा जास्त नसावे.
  • AAY कार्यक्रमां अंतर्गत साठ वर्ष व त्याहून अधिक वयाच्या वृद्ध आणि पेन्शन धारकांसाठी या योजनेमध्ये पात्रता असेल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दारिद्र्यरेषेखाली असल्याचे दाखविले पाहिजे.
  •  अंत्योदय अन्न ही योजना  सर्व ग्रामीण आणि डोंगराळ भागासाठी मदत करते .
  •  निराधार विधवा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अंत्योदय अन्न योजनासाठी शहरी भागातील लाभार्थी

   AAy चा उद्देश साठ वर्षाहून अधिक असलेल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा त्याहून जास्त वय असणाऱ्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असलेले कुटुंब, रस्त्यावर फळे आणि फुले विकणारे विक्रेते, झोपडपट्टी मधील रहिवासी, घरगुती कामगार त्यांच्यासाठी या योजनेचा फायदा होईल. रिक्षा चालक इतर कोणतीही रोज दारीवर काम करणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.

अंत्योदय अन्न योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  •  बीपीएल प्रमाणपत्र
  •  उत्पन्न प्रमाणपत्र
  •  अर्जदारांनी यापूर्वी कधीही राशन कार्ड घेतलेले नाही असे  प्रतिज्ञापत्र

अंत्योदय अत्र योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता .

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वेबसाईट उघडा आणि नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करा निवडा.

त्यानंतर राज्य / केंद्रशासित अन्न  पोर्टल यादी आता दर्शवित केली  जाईल. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्यावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या माहिती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न  योजना असा अर्ज फॉर्म भरा.

आणि सर्व अर्ज भरून झाल्यावर  सबमिट बटनावर क्लिक करा

 अंत्योदय आन्न योजना pdf

लाभार्थ्याची निवड व योजनेच्या अंमलबजावणी अंत्योदय अन्न योजना बाबत महाराष्ट्र शासनाचा जीआर (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “अंत्योदय अन्न योजना (AAS)”

Leave a comment