लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना annabhau sathe vikas mahamandal

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना

annabhau sathe vikas mahamandal

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज या लेखामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाज व त्यांच्या 12 पोटजाती यांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 11 जुलै 1985 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली.

शेतकरी ग्रामीण गोदाम योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजना काय आहे?

आपल्या राज्यातील अनेक जमाती आणि जाती आजही गरीब परिस्थितीमध्ये जगतात. आपल्या राज्यांमधील  आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतात त्यांची परिस्थिती नसते. अशा मातंग समाज व त्यांच्या 12 पोटजाती  यांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने ही योजना राबवण्यात आली.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

मातंग समाजात खालील प्रमाणे 12 पोटजाती आहेत

  •  मांग
  •  मदारी
  • मातंग
  •  राधेमांग
  •  मिनी
  •  मदिग
  • मांग गारुडी
  •  माडींग
  •  डंखनी
  •  मांग माडगी
  •  महशी
  •  मडीगा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबवले जातात

  •  बीज भांडवल योजना (Margin Money)
  •  विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)
  •  शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme)
  •  National Scheduled Castes Finance & Developmnt Corporation योजना (NCFDC

बीज भांडवल योजना

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत आहे त्याना 50,001ते 7,00, 000 रु बँक कर्ज
  • रू .50,001 ते 7,00,000 पर्यंतच्या मंजुर कर्जा मध्ये रू.10,000 अनुदान वगळता उर्वरित कर्ज रक्कम खालील प्रमाणे विभागली जाईल.
  •  50% अर्जदाराचा सहभाग 20 % महामंडळाची कर्ज (रु.10,000 अनुदानासह)
  •  75 % बँकेचे कर्ज परतफेड बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँक कडे करावयाची असून महामंडळाची कर्ज द. सा. द. शे.4% व्याजासह महामंडळाकडे परत करायचे आहे.

विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना

  1.  1 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या गरजूंना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याकरिता 50 हजार पर्यंत प्रकल्प असणाऱ्यांना कर्ज.
  2. प्रशिक्षण योजना (कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण योजना )
  3. मातंग समाजाच्या युवक/ युवतींना  स्वयंरोजगार मिळण्यास मदत.
  4. निधी: विशेष सहाय्य योजनेच्या एकूण निधी पैकी 10% निधी याचा असतो .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजना

  • पात्रता

मातंग समाजातील इयत्ता दहावी, बारावी पदवी व पदविका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार पात्र केले जातात व शिष्यवृत्ती उपलब्ध असलेल्या एकूण रकमे पर्यंत एक वेळा बक्षीस म्हणून प्रदान केली जाते.

  • शिष्यवृत्ती
  1. दहावी एक हजार रुपये
  2.  बारावी 1,500 रुपये
  3. पदवी व पदविका दोन हजार रुपये
  4. अभियांत्रिक व वैद्यकीय 2,500 रुपये

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित योजना

 मुदत कर्ज योजना

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

या योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करिता एन. एस. एफ डी. सी. मार्फत पाच लाखापर्यंत गुंतवणूक असलेल्या व्यवसायाच्या योजनांना मुदत कर्ज दिले जाते ते कर्ज फेडीची मुदत एन . एस . एफ. डी .सी ठरवेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत असेल. आणि कर्ज रकमेवरील व्याजदर व महामंडळाच्या कर्ज रकमेवरील व्याज दर 4 टक्के असेल. महामंडळाच्या कर्ज रकमेची परतफेड एन. एस. एफ. डी .सी च्या कर्ज रकमेच्या परत फेडीसह करावयाची आहे.

लघुऋण वित्त योजना

स्मॉल क्रेडिट फायनान्स योजना N.S.F.D.C. अंतर्गत 2000 ते 2001 पासून राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी एन. एस. एफ .डी .सी. चे मुदत कर्ज 40 व महामंडळाचे अनुदान 10 हजार असे एकूण 50 हजाराच्या मर्यादेत लहान व्यवसायांना लाभ दिला जातो.

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

महिला समृद्धी योजना

ही योजना सन २००४-५ पासून महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी एन. एस. एफ. डी .सी .मुदत कर्ज 40 हजार रुपये व महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये असे एकूण 50 हजार पर्यंत लाभ देण्यात येतो. ही योजना फक्त महिला लाभार्थीच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये विधवा आणि गरीब महिलांना लाभाच्या बाबतीत प्रधान्य आहे. (यामध्ये 50% शहरांमध्ये आणि 50 टक्के ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना दरवर्षी चार टक्के व्याजदराने नफा मिळतो)

महिला किसान योजना

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

N.S.F.D.C. दिल्लीच्या साह्याने हा कार्यक्रम फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाची पहिली अट आहे की अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य कृषी मालमत्तेचा मालक असणे आवश्यक आहे. योजनेचा प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये आणि N.S.F.D.C. सहभाग 40 हजार रुपये महामंडळाचे अनुदान दहा हजार रुपये आणि त्याचा व्याजदर 5%आहे.

शैक्षणिक कर्ज योजना

कॉर्पोरेशनचा शैक्षणिक कर्ज कार्यक्रम केवळ अधिकृतपणे मान्यता प्राप्त विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहे,
शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खालील पुरवठा आवश्यक आहेत आणि कर्जाद्वारे कव्हर केले जातील

हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा
  •  प्रवेश फी व शिकवणी
  • फी परीक्षा फी
  • अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी पुस्तके
  • राहण्याचा व जेवणाचा खर्च
  •  कर्ज परतफेडीपूर्वी अर्जदाराचा मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास कर्जाची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी विमा पॉलिसी प्रीमियम भरला जातो
  •  प्रदेशात शिक्षण घेता येणारा प्रवास खर्च व शिक्षणाच्या कालावधीसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद इत्यादी

पात्रता

  •  विद्यार्थी हा अनुसूचित जातीच्या बारा पोटजाती पैकी एकाचा किंवा मातंग समाजाचा सदस्य असावा
  • व्यवसायिक/ तांत्रिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी

  •  अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  •  अर्जदार व्यक्तीचे वय किमान 18 आणि 50 पेक्षा जास्त नसावे.
  •  या योजनेसाठी लाभार्थी हा मातंग समाजाच्या बारा पोटजातीपैकी एक असावा.
  •  अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असावे.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे

  •  उत्पन्ना प्रमाणपत्र
  •  जातीचा दाखला
  •  आधार कार्ड
  •  राशन कार्ड
  •  दोन पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसायाचे दर पत्रक(कोटेशन)
  •  रहिवाशी प्रमाणपत्र

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.
  • त्यासाठी वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज फॉर्म डाऊनलोड करा आणि पूर्ण करा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • आणि पूर्ण भरलेला अर्ज, आवश्य कागदपत्रे ऑनलाइन सादर करा.

अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

Leave a comment