ई पीक पाहणी
महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीकपेरा या अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही या लेखातून आज आपण स्वतः आपल्या मोबाईल वरून ई-पीक पाहणी करून आपल्या सातबारे वर आपल्या पिकाची नोंद कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
खरीप 2025 साठी ई पिक पाहणी करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी अंतिम तारखेच्या आत आपली ई पिक पाहणी करून घ्यावी असे आवाहन सरकार कडून करण्यात येत आहे.

ई-पीक पाहणी ऍप कसे घ्यावे
ई-पीक पाहणी ऍप डाऊन लोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करा त्या मध्ये ई पीक पाहणी 3.० (E Pik Pahani 3.0 ) असे नाव शोधा आपणास ई पीक पाहणी ऍप दिसेल ते ऍप इंस्टाल करून घ्या .
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा. येथे क्लिक करा
येथे क्लिक करून आपण ऍप डाऊनलोड करू शकता https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
अशी भरा नवीन खातेदार माहिती
१ नवीन खातेदार नोंदणी करा
२ तुमचा विभाग निवडा
३ तुमचा जिल्हा निवडा
४ तुमचा तालुका निवडा
५ तुमचे गाव निवडा
६ तुमचे नाव / मधले नाव /आडनाव / खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कोणत्याही एक निवडून माहिती भरावी
७ शोधा वर क्लिक करावे
८ खातेदार निवडा वर क्लिक करून आपले नाव निवडा
९ पुढील ⇒ बटनावर क्लिक करा
१० आपला मोबाइल क्रमांक भरा
११ त्या नंबर वर आलेला OTP भरा
आता आपली खातेदार नोंदणी यशस्वी झालेली आहे.
या पद्धतीने भरा ई-पीक पाहणी माहिती
खातेदाराचे नाव निवडा
- ४ अंकी संकेतांक भरा ( माहीत नसल्यास संकेतांक विसरलात ?या वर क्लिक करून संकेतांक मिळऊ शकतात)
- पीक माहिती नोंदवा या पर्याय वर क्लिक कर
- खाते क्रमांक निवडा
- गट क्रमांक निवडा
- तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल
- तुमचे पोटखराब क्षेत्र दाखवेल
- हंगाम निवड करा
- एकूण पेरनियोग्य क्षेत्र दाखवेल
- पिकाचा वर्ग निवड करा
- पिकाचा प्रकार निवड करा (पीक /फळबाग )
- पिकाचे नाव निवडा
- क्षेत्र भरा (पीक घेतलेले क्षेत्र )
- जल सिनचाचे साधने निवड करा
- सिंचन पद्धती निवडा
- लागवडीचा दिनांक अचूक भरा
- अक्षांश रेखांश मिळवा या वर क्लिक करा
- आपल्या पिकाचा फोटो घ्या
- शेवटी सबमिट √ बटणवर क्लिक करा
या पद्धतीने आपण आपली ई पीक पाहणी करू शकता , आपण नोंदवलेली माहिती ४८ तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकतो.
टीप : बऱ्याच शेतकऱ्यांना आपली ई पिक पाहणी करताना अडचणी येत आहेत. या मध्ये विविध अडचणी असतील जसे की अंतर जास्त आहे, तुम्ही त्या गटात उपलब्ध नाही. पिकाचा फोटो घेतला तरी फोटो घ्या. लोकेशन प्रॉब्लेम. अश्या शेतकऱ्यांनी आपले अॅप डिलिट करून परत इंस्टॉल करावे जेणे करून परत ही अडचण आपणास येणार नाही.
या लेखाच्या माध्यमातून आपण ई पीक पाहणी बद्दलची सर्व माहिती घेतली आहे. आपल्याला या बद्दल काही अडचण असेल तर नक्की आमच्याशी संपर्क सध्या आम्ही नक्कीच आपली मदत करू.
