adhar card new update : प्रत्येक नागरिकाला डिजिटल स्वरूपात आपली ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असणार कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असून कुठेही आपली ओळख पटवायची असो यासाठी महत्त्वपूर्ण आधार कार्ड ठरलेले आहे. प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड जमा करणे किंवा त्याची झेरॉक्स जमा करणे आवश्यक होते. यावरच सरकारने नवीन आधार ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून आधारचा वापर मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. ज्यामुळे नागरिकांना अगदी सहजरित्या आपले आधार डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देता येणार आहे. हे ॲप अगदी यूपीआय याप्रमाणे वापरण्यास सोपे करून देण्यात आलेले आहे.
या नवीन अपडेटच्या माध्यमातून नागरिकांना फिजिकल स्वरूपामध्ये आपले आधार कार्ड वागवण्याची आवश्यकता राहणार नाही. कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असल्यास आपण आपल्या आधार कार्ड डिजिटल स्वरूपात देखील सादर करू शकणार आहात. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना डिजिटल ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

adhar card new update स्मार्टफोनच्या माध्यमातून देशातील नागरिकांना डिजिटल आधार सेवा प्रदान केली जाणार आहे. यासाठी फेस आधारित आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आलेला आहे. आधार कार्ड च्या माध्यमातून नागरिकांचे होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲपचा नागरिकांना काय फायदा होणार? याचा वापर कसा करावा लागणार? नागरिकांना हे ॲप कधीपासून वापरण्यास मिळणार? याविषयीची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
हे वाचा: आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल बंद?
काय आहे नवीन आधार ॲप adhar card new update
- या नवीन ॲप मध्ये नागरिकांची ओळख तपासणीसाठी क्यूआर कोड द्वारे आणि रियल टाईम फेस (चेहरा स्कॅन करून) वापरण्यात येणार आहे.
- देशातील नागरिकांना प्रवास करताना हॉटेलमध्ये तपासणी करताना किंवा इतर कोणत्याही कामासाठी नागरिकांना फिजिकल आधार कार्ड सोबत ठेवण्याची किंवा त्याची झेरॉक्स सांभाळण्याची आवश्यकता लागणार नाही.
- अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांना चेहरा स्कॅन करून आणि यायच्या मदतीने आपली ओळख सिद्ध करता येणार आहे
- नागरिकांना कोणत्याही ठिकाणी आधार कार्डची फिजिकल कॉपी सादर करणे आवश्यक राहणार नाही. त्या ऐवजी नागरी या ॲपच्या माध्यमातून किंवा आर कोड स्कॅन करून आधार संबंधित असणारी सर्व पडताळणी डिजिटल स्वरूपात पूर्ण करू शकतील.
- ॲप वापर करणाऱ्या नागरिकांना केवळ आवश्यक माहितीच द्यावी लागेल. यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती उघड होणार नाही.
- ज्याप्रमाणे आपण क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करतो. त्याच पद्धतीने आधार पडताळणी देखील क्यूआर कोड च्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. हे प्रमुख वैशिष्ट्य या आधार ॲपचे निर्माण करण्यात आलेले आहे.
- ॲप वापर करताना फक्त क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल आणि या क्यूआर कोड च्या माध्यमातून त्यांची ओळख पटवली जाईल.
- या ॲपच्या मदतीने नागरिकांना सोबत आधार कार्डची प्रत वागवण्याची आवश्यकता राहणार नाही. आपले आधार कार्ड आपण डिजिटल स्वरूपातच प्रत्येक ठिकाणी ओळख पटवण्यासाठी सादर करू शकतो.
- या नवीन ॲपच्या माध्यमातून आधारकार्ड चा होणारा अनधिकृत वापर रोखता येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
- हे नवीन तयार केलेले ॲप uidai यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आले आहे.
- हे नवीन तयार करण्यात येणारे ॲप पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आणि सुरक्षित आहे. म्हणजे हे ॲप वापरकर्त्याच्या परवानगीनेच वापरता येईल.
नागरीकांना कधी उपलब्ध होणार
नागरिकांसाठी उपयुक्त असणारे हे डिजिटल ॲप नागरिकांना वापरण्यासाठी कधी उपलब्ध होणार अशी देखील उत्सुकता अनेक नागरिकांमध्ये लागली आहे. याचे सुरुवातीला काही मर्यादित लोकांनाच वापरासाठी उपलब्ध केले जाणार आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी आधार संवाद कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले असेल अशा नागरिकांना सुरुवातीला यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
याबाबत यूआयडीआयने लवकरच सर्वांसाठीच हे ॲप उपलब्ध करून दिले जाईल अशी देखील माहिती जाहीर केली आहे. ॲप उपलब्धतेबाबत अद्याप पर्यंत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्याच्या सर्व तपासण्या आणि वापरकर्त्याच्या माध्यमातून येणाऱ्या प्रतिक्रिया यावर विचार करून हे ॲप सर्व नागरिकांसाठी वापरास उपलब्ध करून दिले जाईल.
आधार ॲपचा नागरिकांना फायदा काय
वरील दिलेल्या माहितीच्या आधारेच आपल्याला नागरिकांना काय फायदा होणार हे स्पष्ट झाला असेल. परंतु तरीदेखील सोप्या शब्दांमध्ये नागरिकांना या आधाराचा कसा फायदा होणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच ठिकाणी आवश्यकता नसताना देखील नागरिकांना आधार कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्ड वरील संपूर्ण माहिती द्यावी लागते.
काही ठिकाणी फक्त तुमची ओळख महत्त्वाचे असताना देखील तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी सादर करावी लागते. त्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला फक्त आपली ओळख देत असताना आपल्याला आपली वैयक्तिक माहिती देखील त्या आधारकार्ड च्या माध्यमातून त्या व्यक्तीकडे जमा करावी लागते. या नवीन ॲपच्या माध्यमातून अशी कोणतीही वैयक्तिक माहिती समोरच्याला उपलब्ध होणार नाही.
नागरिकांना आपल्या सोबत आपल्या आधारकार्ड चे हार्ड कॉपी वापरण्याची देखील आवश्यकता राहणार नाही. ज्याप्रमाणे आपण सध्या यूपीआय वापर करत असताना आपल्या सोबत कॅश वागवत नाही त्याच प्रकारे आधार कार्ड देखील वागवण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या
ठिकाणी आपल्याला आधारकार्ड आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच डिजिटल स्वरूपात आपले आधार सादर करू शकतात. यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे. वैयक्तिक माहिती इतर ठिकाणी न गेल्यामुळे. नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यास मदत होइल.